मुंबई : केरळमध्ये दुर्मिळ प्रकारच्या मेंदुच्या तापाने थैमान घातल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत झपाट्याने पसरत असलेल्या या आजारावर कोणताही ठोस उपचार, इंजेक्शन उपचार नसल्याने या व्हायरचा धोका झपाट्याने पसरत आहे. WHO या संघटनेने देखील या आजाराबद्दल अलर्ट जारी केला आहे. 2018 साली WHO ने या व्हायरसचा समावेश मानवी आणि जनावरांच्या आरोग्याला धोकादायक असणार्या व्हायरसमध्ये केला आहे.
1. 1998 साली मलेशियातील सुंगाई निपाह गावात डुक्करांमध्ये हा व्हायरस पहिल्यांदा आढळला. एका व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाला. यावरूनच व्हायरसचे नाव 'निपाह' ठेवण्यात आले आहे. त्यानंतर हा व्हायरस सिंगापूरमध्ये पसरला. 2004 साली बांग्लादेशातही या व्हायरसने धोका निर्माण केला आहे.
2. RNA(रिबोन्यूक्लिक एसिड) व्हायरसमुळे याची निर्मिती झाली आहे. आरएनए वायरस पैरामाईक्सोविरिडी (Paramyxoviridae) आणि हेनीपावायरस (Henipavirus)या वंशातील आहे. हेंड्रा (Hendra)व्हायरसच्या जातीशी मिळतीजुळती आहे.
3. डुक्करांमध्ये हा व्हायरस फ्रुट बॅट (वटवाघुळाचा प्रकार) यामुळे आला. इतर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्येही या व्हायरसचा धोका वाढला आहे. हा एक zoonotic disease मध्ये असणार्या या आजारात मलेशियामध्ये 50 % रूग्णांचा मृत्यू झाला होता.
4. ताप, उलट्या, शुद्ध हरपणं, अस्वस्थ वाटणं, मळमळणं अशी या आजाराची लक्षण आहेत.
केरळमधील कोझिकोड जिल्ह्यामध्ये मागील दोन आठवड्यांपासून 'निपाह' या विषाणूमुळे एकाच परिवारातील 3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
झपाट्याने पसरत असलेल्या 'निपाह' व्हायरसच्या धोक्यामुळे सरकारनेही वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी देखील मदतीसाठी खास यंत्रणा काम करत असल्याची माहिती दिली आहे.
Reviewed the situation of deaths related to nipah virus in Kerala with Secreatry Health. I have directed Director NCDC to visit the district and initiate required steps as warranted by the protocol for the disease in consultation with state government.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) May 20, 2018