What Is Death Rattle: मृत्यूपूर्वी प्रत्येकाला एक नैसर्गिक संकेत मिळतो असं म्हटलं जातं. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेकांबद्दल हे वाक्य आवर्जून वापरलं जातं. मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या या संकेतांनंतर मरणाच्या दारात असताना व्यक्ती कशाप्रकारे आवाज करतात याबद्दलचा धक्कादायक खुलासा रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सने केला आहे. मृत्यूपूर्वी व्यक्ती जे आवाज कढते त्याला डेथ रॅटल असं म्हणतात. याच डेथ रॅटलबद्दल ज्यूली मॅकफॅडेन नावाच्या नर्सने काही धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत. मृत्यू शय्येवर असलेल्या रुग्णांची देखभाल करण्याच काम 41 वर्षीय ज्यूली करते. याच आपल्या प्रोफेशनदरम्यान आलेले अनुभव तिने कथन केले आहेत.
मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला मृत्यूला घाबरु नका असा सल्ला ज्यूली तिच्या कामाचा भाग म्हणून देते. मात्र लोक मरणाच्या दारात असताना नेमकं काय करतात, कसे आवाज काढतात याबद्दलचे आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करुन ज्यूलीने हजारो फॉलोअर्स मिळवले आहेत. टिक-टॉकवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ज्यूलीने लोक मरण पावण्याआधी कसे आवाज काढतात हे सांगितलं आहे. रुग्णांनी असे आवाज काढणे ही मृत्यूची चाहूल असते. ही फार सामान्य बाब आहे. 'मृत्यूचा आवाज' नावाने ओखळला जाणारा हा आवाज फार सामान्य असून रुग्ण प्राण सोडण्याआधी हा आवाज माझ्या कानावर पडतो. मात्र तुम्ही असा आवाज यापूर्वी कधी ऐकला नसेल तर तुम्हाला तो फारच भयानक आणि भयावह वाटू शकतो, असं ज्यूलीने तिच्या फॉलोअर्सला सांगितलं आहे.
मृत्यूसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने ज्यूलीने मृत्यूचा आवाज हा वेदनांमुळे येत नाही. आपल्या शरीरामध्ये 24 तास लाळ तयार होत असते. आपला मेंदू ही लाळ गिळण्यास सांगत असतो. मात्र मृत्यू जवळ येतो तेव्हा तोंडात लाळ तयार होत असते मात्र मेंदू ही गिळण्याची सूचना करत नाही. मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळेच व्यक्तीला काहीही गिळता येत नाही. एखादी व्यक्ती बेशुद्ध पडली तरी तिचं तोंड उघडलं असतं यामागील कारणही न्यायू कमकुवत होणं हेच आहे, असं ज्यूलीने सांगितलं.
अशा स्थितीमध्ये तोंडात तयार झालेली लाळ साचून राहते आणि आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असलेली व्यक्ती तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करते. अशावेळी गुळण्या करत असल्यासारखा 'गळ्.. गळ्... गळ्...' असा आवाज येतो. अनेकदा मृत्यूच्या काही क्षण आधी व्यक्तीच्या घशातून हा निघतो. लोकांना हा आवाज ऐकू येतो पण तो कुठून येत आहे हे समजत नाही. एका सामान्य गैरसमजानुसार अनेकांना हा आवाज फुफ्फुसांमधून येतो असं वाटतं.
कधी कधी आम्ही रुग्णाचं तोंड कोरडं करण्यासाठी औषधांचा वापर करतो, असं ज्यूली म्हणाली. काहींना खाटेवर आडवं होण्यास सांगून तर काहींना कूस बदलून हा आवाज रोखण्याचा प्रयत्न आम्ही करतो. लाळ रुग्णाच्या तोंडातून बाहेर पडावी हा एखमेव उद्देश असतो. ही लाळ सक्शन करुन ओढून काढली जात नाही. कारण असं केलं तर अधिक लाळ तयार होते, असंही ज्यूलीने सांगितलं.
पहिल्यांदा हा मृत्यूचा आवाज ऐकणं फार भीतीदायक अनुभव असोत. त्यामुळे याबद्दलची माहिती असणं फायद्याचं ठरतं. ही फार सामान्य बाब आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर घडणारी ही घटना समान्य आहे हे मला या व्हिडीओतून सांगायचं आहे. हा आवाज आपल्याला मानसिक धक्का देऊन जातो असं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळेच मी हा व्हिडीओ तयार केला आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात.