मुंबई : माणसाची उंची ही अशी गोष्ट आहे जी, प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपली आणखी थोडी उंची असावी. तसेच बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, ज्या लोकांची उंची जास्त आहे. त्या लोकांचं व्यक्तीमत्व वजनदार आणि आकर्षक वाटतं. परंतु आज आम्ही तुम्हाला उंची बद्दल अशी काही गोष्ट सांगणार आहोत. जी ऐकून तुम्हाला वाटू लागेल की, माझी कमी उंची आहे, तेच बरं आहे.
शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन संशोधनात असे सांगितले आहे, जास्त उंच असलेले लोक लवकर आजारी पडतात. तसेच त्यांना वेगवेगळया आजारांचा देखील सामना करावा लागतो.
शास्त्रज्ञांच्या मते जर तुमची उंची 5 फूट 9 इंचांपेक्षा जास्त असेल, तर 100 हून अधिक आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. 2.5 लाख लोकांवर केलेल्या या अभ्यासातही हे सिद्ध झाले आहे.
संशोधनात असे म्हटले आहे की, जास्त उंची आपल्याला100 पेक्षा जास्त समस्या घेऊन येते. यामध्ये अनियंत्रित हृदयाचे ठोके, पायांच्या नसांमधील समस्या, नर्व्ह डॅमेज आणि पायात अल्सर यांसह अनेक आजार आहेत. उंच लोकांमध्ये हा आजार होण्याचे कारणही शास्त्रज्ञांनी दिले आहे.
उंच लोकांमध्ये हा आजार का होतो हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील रॉकी माउंटन रिजनल मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या समुदायातील 250,000 लोक आणि महिलांवर संशोधन केले.
हे ते लोक होते ज्यांची सरासरी उंची 5 फूट 9 इंच होती. अशा लोकांमध्ये रोगाचा धोका का अधिक असतो, याची दोन मोठी कारणं तेव्हा त्यांना समोर आली.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, याचे सर्वात मोठे कारण, म्हणजे रक्ताभिसरणावर होणारा परिणाम. माणसाच्या उंचीमुळे लांब अंतरापर्यंत रक्त वाहून नेण्यासाठी शरीराला जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. तर शरीर निरोगी ठेवण्यासाठी रक्ताभिसरण जलद असले पाहिजे.
याशिवाय जास्त उंची असलेल्या लोकांचे शरीराचे वजन जास्त असते, त्यामुळे हाडे, स्नायू आणि पायांवर दबाव वाढतो. त्यामुळे आजारांचा धोकाही वाढतो.
अहवालानुसार, उंच व्यक्तींना 100 पेक्षा जास्त प्रकारचे आजार किंवा विकार असू शकतात. उदाहरणार्थ, रक्ताच्या गुठळ्या, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT), नखांमध्ये बुरशी संसर्ग, पाय आणि त्वचेमध्ये अल्सर, मेंदूच्या पेशींना नुकसान, पाय आणि वैरिकास व्हेन्समध्ये वेदना प्रमुख आहेत.
संशोधक श्रीधरन राघवन सांगतात, त्यांना अशा लोकांमध्ये सुमारे 100 ते 110 विकार आढळून आले आहेत. ते म्हणतात, काही आजारांसाठी माणसाची उंची ही जोखमीच्या घटकासारखी असते, ज्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असते.