Scintefic information of different types of breasts : महिलांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आज आपण त्यांच्या शरिरातील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजेच स्तनाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की महिलांना पाहिलं की अनेक पुरुषांचं लक्ष सर्व प्रथम तिच्या स्तनाकडे जातं. याबाबत दुमत ही असू शकतं. मात्र, स्वत: च्या स्तनाच्या आकाराविषयी अनेक महिलांच्या मनामध्ये शंका असते. महिलांच्या स्तनाच्या आकारामध्ये बदल होत असतात. वयात आल्यावर मुलींच्या स्तनाची वाढ व्हायला सुरुवात होते. पण तरूणपणी असलेला स्तनांचा आकार वयानुरूप कायम तसाच राहतो असे नाही. महिलांच्या आयुष्यात गरोदरपणाचा महत्त्वाचा टप्पा येतो त्यावेळी स्तनांच्या आकारामध्ये बदल होतो. तसेच उतारवयात मेनॉपॉझच्या दरम्यानही काही महिलांमध्ये स्तनाच्या आकारात बदल व्हायला सुरुवात होते.
तसेच अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळातही स्तनाच्या आकारात हलकासा बदल झाल्याचं जाणवतं. मात्र, स्तनांच्या आकाराविषयी अनेक महिला एकमेकींशी कूजबूज करायलाही घाबरतात. अनेक महिलांचं एक स्तन दुसऱ्या स्तनाच्या तुलनेत काहिसं लहान असतं. त्यामुळे या महिलांना त्याविषयी न्यूनगंडही असतो. म्हणून आपण जाणून घेणार आहोत स्तनांच्या वेगवेगळ्या आकाराविषयी असं म्हणतात, प्रत्येक महिलेच्या स्तनाचा आकार आणि साईझ युनीक असते. स्तनांच्या आकारावरून त्याचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. मात्र, त्यास कोणताही वैज्ञानिक किंवा अधिकृत असा आधार नाही.
स्तनाचा आकार हा अनुवांशिकरित्या प्राप्त होतो. परंतु गर्भधारणा आणि स्तनपान, व्यायाम आणि अचानक वजनातील चढ-उतारामुळे तो बदलू शकतो. गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना स्तन तात्पुरते मोठे होऊ शकतात. कधीकधी, स्तनाचा आकार वजन वाढणे किंवा लैंगिक उत्तेजनाशी संबंधित असू शकतो. काही औषधांमुळेही स्तनाला सूज येऊ शकते. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे सूज आल्याचे अनेक जणींना निदर्शनास येते.
कोणाचेही शरीर पूर्णपणे सममितीय नसते. त्यामुळे दोन्ही स्तनांचा आकार एकसारखा नसू शकतो. 2006 मध्ये, ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च या ब्रिटीश वैज्ञानिक जर्नलने डेटा प्रकाशित केलेल्या माहितीनुसार 504 मधील फक्त एका महिलेचं स्तन हे सममितीय होते. किशोरवयीन मुलींमध्ये ही सामान्य बाब आहे, कारण त्यांच्या स्तनाची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे जर यामध्ये न्यूनगंड बाळगण्याचं काहीच कारण नाही.
scintefic information of different types of breasts