मुंबई : आजकाल तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा यामुळे अनेकांमध्ये पित्ताचा त्रास वाढणं हे अगदीच सामान्य झाले आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणारे अनेकजण डोकेदुखी, अपचन, अंगदुखी अशा लहानसहान समस्यां तात्पुरते औषधगोळ्या घेऊन दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.
पित्ताचा त्रास वाढणं ही समस्या आगदीच सामान्य झाल्याने अनेकजण त्यावर मात करण्यासाठी अॅन्टासिड्सची मदत घेतात. मात्र शरीराला सतत अॅन्टासिड्स घेण्याची सवय लावल्यास त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. काही मेडिकल रिसर्च आणि त्याच्या निष्कर्षानुसार, अॅन्डासिडच्या सेवनामुळे किडनीवर दुष्परिणाम होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, पीपीआयचा डोस आणि किडनी खराब होणं याचा एकमेकांशी संबंध आहे. सुमारे 10,482 लोकांवर केलेल्या रिसर्चनुसार, पीपीआयचा डोस न घेणार्यांच्या तुलनेत या ती औषध घेणार्यांमध्ये किडनी खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा
अॅन्डासिड्ची औषधं आनि किडनीचं आरोग्य यावर अजून बरेच संधोधन होणे गरजेचे आहे. मात्र पीपीआयमुळे रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते परिणामी किडनीच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नये. उन्हाळयात वाढणारी डोकेदुखी आणि पित्त आटोक्यात ठेवण्यासाठी खास टीप्स
पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. तसेच खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा पाळणं आवश्यक आहे. नारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय
पित्ताचा त्रास होत असल्यास हलके फुलके पदार्थ खावेत. यामध्ये पेज, मूगडाळीचे वरण - मऊभात, दही भात, ताक असे पदार्थ खावेत.
ओवा, जिरं, खडीसाखर खाल्ल्यानेही पित्ताच्या त्रासातून आराम मिळण्यास मदत होते. या घरगुती चाटणाने दूर करा अपचनाचा त्रास
पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी थंड दूधही फायदेशीर ठरते.
मात्र केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.