शुभ्र आणि चमकदार दातांसाठी खास उपाय....

तुमचे हास्य हे तुमच्या सौंदर्याबरोबरच तुमच्या आरोग्याचे ही प्रतीक आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 17, 2018, 05:04 PM IST
शुभ्र आणि चमकदार दातांसाठी खास उपाय....

मुंबई : तुमचे हास्य हे तुमच्या सौंदर्याबरोबरच तुमच्या आरोग्याचे ही प्रतीक आहे. त्यामुळे तोंडाचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. दिवसभरातून फक्त ५ मिनिटे आपण दातांच्या स्वच्छतेसाठी  देतो. ती पण घाईघाईतच. परंतु, हे पुरेसे नाहीये. दात स्वच्छ व चमकदार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही जिन्नस उपयुक्त ठरतात.  

त्यामुळे महागड्या ट्रीटमेंट पेक्षा या सोप्या ट्रिक्स नक्की करूंन बघा. 

साहीत्य:

  • संत्र, मोसंबी किंवा लिंबू यांसारख्या (citrus fruit) फळांचा एक मोठा तुकडा.
  • ३-४ तुमच्या आवडत्या टूथपेस्ट (अधिकतर सफेद टूथपेस्ट, जेल वापरू नका.)
  • अर्धा चमचा बेकींग सोडा.
  • चिमूटभर कोळशाची पावडर (असेल तर).
  • एक टूथपीक.
  • एक लहान चमचा.

कृती:

  • सायट्रस फळाचा तुकडा काही वेळ चावत रहा. जोपर्यंत त्यातून रस बाहेर येत नाही. नंतर तो तुकडा बाहेर काढा. फळाचा काहीसा गर दाताला चिकटून राहील. एका कोरड्या भांड्यात ३-४ तुमच्या आवडत्या टूथपेस्ट घ्या आणि त्यात थोडी कोळशाची पावडर घाला.
  • टूथपीकने ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात बेकिंग पावडर घालून पुन्हा मिक्स करा. आता फळाच्या तुकड्यावर ते मिश्रण लावा. आणि ते फळ खाताना तुमच्या दोन्ही ओठांना (वरचा आणि खालचा) ते मिश्रण पूर्णपणे लागलं पाहिजे.
  • फळाचा तुकडा ५ मिनिटे तोंडात ठेवा. जर जास्त स्वच्छतेची गरज असेल तर तो तुकडा अधिक वेळ तोंडात ठेवा. नंतर तो तुकडा काढून फेकून द्या आणि तुमच्या नेहमीच्या टूथपेस्टने ब्रश करा. आतल्या बाजूच्या दातांकडे विशेष लक्ष द्या. ब्रश करून झाल्यावर स्वच्छ चूळ भरा. 
  • वेगवेगळ्या टूथपेस्टचे कॉम्बिनेशन, कोळसा आणि बेकिंग सोडा यामुळे दातांवरील प्लाग निघून जाण्यास मदत होते. बेकिंग सोड्यामध्ये erosive गुणधर्म असल्यामुळे हा प्रयोग महिन्यातून दोनदाच करा. तसंच हा प्रयोग केल्यानंतर लगेच काही थंड किंवा गरम खाऊ नका. त्यामुळे दातात सेन्सिटिव्हिटी जाणवेल.