गरोदरपणात महिलांनी आवर्जून कराव्यात 3 गोष्टी, जन्मतःच मुलं होती बुद्धिमान आणि गुणवान, Sri Sri Ravi Shankar

गरोदर महिलांना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी नऊ महिने खास गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या मेंदूवर होतो. ज्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होताना दिसेल. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 4, 2024, 08:08 PM IST
गरोदरपणात महिलांनी आवर्जून कराव्यात 3 गोष्टी, जन्मतःच मुलं होती बुद्धिमान आणि गुणवान, Sri Sri Ravi Shankar

गर्भधारणा हा एक अतिशय अनमोल सण आहे. हा काळ महिलांसाठी अतिशय खास असतो. गरोदरपणाच्या 9 महिन्यात काय करावं? काय करु नये हे अनेक महिलांना माहित नसते. या दिवसांमध्ये काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. कारण आईची एक चूक गर्भातील बाळासाठी महागात पडू शकते. 

एका महिलेने गुरु श्री श्री रविशंकर यांना गर्भवती महिलांनी काय करावे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे विचारले. जर तुम्ही देखील गर्भवती असाल किंवा गर्भधारणेचा विचार करत असाल तर गुरुदेवांनी दिलेल्या टिप्स तुमच्यासाठीही खूप उपयुक्त ठरू शकतात. श्री श्री रविशंकर यांनी गर्भवती महिलांसाठी काय टिप्स दिल्या आहेत.

गरोदरपणात महिलांनी कराव्यात 'या' गोष्टी 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gurudev Sri Sri Ravi Shankar (@gurudev)

संगीत ऐका 

गरोदर स्त्रियांनी संगीत ऐकावे असे गुरुदेवांनी सांगितले. या दिवसांत गर्भवती महिला इंस्टिमेंटल संगीत ऐकावे. रात्री झोपण्यापूर्वी ऐकल्याने जास्त फायदा मिळतो. या व्यतिरिक्त तुम्ही यावेळी भितीदायक चित्रपट पाहू नका आणि अशी दृश्ये पाहणे टाळा ज्यात जास्त हिंसाचार दिसून येईल. तुम्हाला घाबरवणाऱ्या गोष्टी पाहणे टाळावे.

हिरवा रंग महत्त्वाचा 

गुरुदेव म्हणाले की, भारतासारख्या पारंपरिक देशात महिलांनी गरोदरपणात हिरवा रंग सोबत ठेवावा. तुम्हाला हिरवा दिसतो किंवा या रंगाचे कपडे घाला. हिरव्या रंगाची प्रत्येक छटा फायदेशीर ठरेल. हा रंग तुम्ही तुमच्या आजूबाजूला ठेवावा पण लाल आणि राखाडी रंग टाळा. हे रंग आपल्या मेंदूवर परिणाम करतात. यावेळी तुम्ही तुमच्या आजूबाजूला फक्त हिरवा रंग ठेवावा.

हिरव्या रंगाचा काय परिणाम होतो? 

बोल्डस्कीमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, हिरवा रंग हे जन्माचे प्रतीक आहे. हे नवीन सुरुवातीचे घटक आहे. हा रंग पृथ्वीसाठी नवीन जन्मासारखा आहे आणि म्हणूनच तो गर्भधारणेशी संबंधित आहे. याशिवाय, हिरवा रंग शक्ती आणि निरोगी वाढीचा रंग आहे. यामुळेच गर्भवती महिलांना त्यांच्या सभोवतालच्या परिसरात शक्य तितका हिरवा रंग ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

संगीताचा काय परिणाम होतो 

युनिसेफच्या मते, गरोदरपणात संगीत ऐकल्याने मुलाच्या मेंदूचा विकास होतो. यामुळे गर्भवती महिलेला आराम वाटतो. तिसऱ्या त्रैमासिकात मुलाला संगीत चांगले ऐकू येते. यावेळी तुम्ही शास्त्रीय संगीत, अंगाई किंवा फक्त इंस्टिमेंटल ऐकलं तर त्याचा सकारात्मक फायदा होतो.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)