मुंबई : पाणी न पिता औषधं घेणारी मंडळी तुम्हीही पाहिली असतील. घाईगडबडीत पाण्याशिवायच गोळ्या घेतल्या जातात. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी नक्कीच महागात पडले. अलिकडेच झालेल्या संशोधनात हा खुलासा झाला आहे. पाहुया काय आहे कारण...
पाण्याशिवाय औषधं घेतल्यास अन्ननलिकेला नुकसान पोहचते, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. अन्ननलिका आपल्या तोंडापासून पोटाला जोडते. त्यामुळे तोंडात घातलेली कोणतीही गोष्ट पोटात पोहचते. संशोधनानुसार, पाण्याशिवाय घेतलेल्या गोळ्या, औषधे अन्ननलिकेला चिकटू शकतात. यामुळे इंफेक्शन किंवा जळजळ होऊ शकते. हा त्रास नंतर वाढतो. व त्यामुळे छातीत जळजळ होणे, छातीदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. गोळीच्या आकारानुसार हा त्रास कमी-जास्त असतो. इतकंच नाही तर आतमध्ये ब्लीडिंगही होऊ शकतं.
त्याचबरोबर तुमच्या या सवयीमुळे अल्सरही होऊ शकतो. टर्किश जर्नल ऑफ गेस्ट्रोएंथ्रोलॉजीच्या एका संशोधनानुसार, व्हिटॉमिन सी ची गोळी आरामात चघळू शकतो. पण तरी देखील ती गोळी पाण्यासोबत घेणे योग्य ठरेल. गोळ्या घेताना कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. त्याचबरोबर झोपून गोळ्या घेऊ नका. यामुळे गोळी अन्ननलिकेला चिकटण्याची शक्यता अधिक असते. म्हणून नेहमी एका जागी स्वस्थ बसून पाण्यासोबतच गोळ्या घ्या.