...म्हणून पुरुषांना नाही मिळणार कोरोना लस

मुंबईमध्ये 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.

Updated: Sep 17, 2021, 09:47 AM IST
...म्हणून पुरुषांना नाही मिळणार कोरोना लस title=

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सगळीकडे लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सरकारने लसीकरण मोहीमेवर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावं याकडे सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. तर मुंबईमध्ये आज केवळ महिलांना लस दिली जाणार आहे.

मुंबईमध्ये 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे त्यांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी सरकारी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांनाच लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रांवर पुरुषांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिलीये.

आज मुंबईतील सरकारी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर पुरुषांना प्रवेश मिळणार नाहीये. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फक्त महिलांनाच लस दिली जाणार आहे. महिलांना डायरेक्ट लसीकरण केंद्रावर येऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्रानिमित्त थेट नोंदणीची (वॉक इन) सुविधा ठेवण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व 227 प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि सर्व शासकीय आणि पालिका रुग्णालय तसंच कोविड सेंटर (Covid Center) येथील लसीकर केंद्रावर महिलांना डायरेक्ट लस घेता येणार आहे. याची मुंबईतील सर्व महिलांनी नोंद घेत कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असं आवाहन केलं जातंय. या प्रयोगामुळे महिलांमध्ये लस घेण्याचं प्रमाण वाढेल असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात आहे.