मुंबई : मूळव्याध हा एक अत्यंत त्रासदायक विकार आहे. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास त्याचा त्रास अत्यंत गंभीर होतो. मग या त्रासातून मुक्ताता मिळवण्यासाठी शस्त्रक्रियेसारख्या उपचारांची मदत घ्यावी लागते. म्हणूनच सुरूवातीच्या टप्प्यात या समस्येवर उपाय म्हणून हा घरगुती उपाय करून पहा.
मूळव्याधीच्या समस्येपासून काही अंशी आराम मिळवण्यासाठी ‘जिरं’ अत्यंत उपयुक्त आहे. जिर्यात कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, सोडीयम, पोटॅशियम, व्हिटामिन सी व व्हिटामिन ए यांचे मुबलक प्रमाण असते. जिर्याचे सेवन केल्याने संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
जिर्यामध्ये फायबर व वात कमी करण्याची क्षमता असल्याने पचन सुधारते तसेच शौचाला सुलभ होऊन मळ मऊ होण्यास मदत होते. तसेच पोटातील पचनक्रियेचा मार्ग सुधारून, संसर्ग कमी होण्यासही मदत होते.
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात जिर्याची पूड मिसळून हे मिश्रण प्यावे. हे पाणी प्यायल्यानंतर 3-4 तासांत आराम मिळतो.आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !