तुमच्या त्वचा आणि केसांसाठी अलोवेरा ठरू शकतो फायदेशीर... वाचा काय आहेत फायदे

कोरफडीच्‍या तेलाचा वापर केसांना मजबूत करण्‍यासाठी आणि केस तुटण्यापासून थांबवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Updated: Aug 17, 2022, 11:06 PM IST
तुमच्या त्वचा आणि केसांसाठी अलोवेरा ठरू शकतो फायदेशीर... वाचा काय आहेत फायदे title=

Health Tips: आपण आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी नेहमीच चांगले काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो. त्यातून आरोग्यादायी काय असेल याचा शोध हा आपला सुरूच असतो. तेव्हा कोरफड जे आपल्या शरीरासाठी चांगले असते त्याचा वापर आपण आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठीही करू शकतो. 

एलोवेरो म्हणजे कोरफडचे जेलच नाही तर त्याचे तेलही आपल्यासाठी खुप फायदेशीर ठरते. कोरफडीच्‍या तेलाचा वापर केसांना मजबूत करण्‍यासाठी आणि केस तुटण्यापासून थांबवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

कोरफडीच्या तेलाचे केसांना फायदे 
1. कोरफडचे तेल हे कोंड्याच्या समस्येवर फायदेशीर आहे. केसांमधील कोंडा किंवा कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी कोरफडीच्या तेलाचा वापर खूप फायदेशीर आहे. स्कॅल्पमधील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी देखील याचा वापर होतो. तुम्ही याचा वापर नैसर्गिक केस क्लिन्झर म्हणूनही करू शकता.
2. केस मजबूत आणि घट्ट करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. केस मजबूत आणि जाड तसेच लांब करण्यासाठी कोरफडीच्या तेलाचा वापर खूप उपयुक्त ठरतो. त्यात असलेले गुणधर्म केसांच्या वाढीला गती देण्याचे काम करतात. कोरफडीमध्ये मिनिरल्स आणि एन्झाइम्स आढळतात ज्यामुळे केस मजबूत आणि लांब होतात.

त्वचासाठी कोरफडचे फायदे - 
1. त्वचेची चमक किंवा तेज वाढवण्यासाठी कोरफडीच्या तेलाचा वापर खूप फायदेशीर आहे. यातील जीवनसत्त्वे आणि इतर गुणधर्म त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात.
कोरड्या त्वचेवर कोरफड फायदेशीर आहे. 
2. कोरफडीचे तेल त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला निरोगी बनवतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचारावर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)