Weight Gain Tips: बारीक आहात, वजन वाढवायचंय? आहारात 'या' स्वस्त गोष्टींचा वापर आजच सुरु करा

ना महागडे प्रोडक्ट्स, ना वारेमाप खर्च... कसं वाढवाल वजन, एकदा पाहाच... 

Updated: Sep 22, 2022, 08:16 AM IST
Weight Gain Tips: बारीक आहात, वजन वाढवायचंय? आहारात 'या' स्वस्त गोष्टींचा वापर आजच सुरु करा  title=
Weight Gain Tips without medecines and protein powder

How To Gain Weight: जसं अती वजन वाढणं शरीरासाठी घातक असतं, त्याचप्रमाणे वजन कमी असणंसुद्धा शरीरासाठी फायद्याचं नसतं. वजन कमी असल्यामुळं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा कमी वजन आजारपणाला निमंत्रणही देतं. कारण, शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. तर मग वजन वाढवण्यासाठी काय करावं? 

कॅलरीचं प्रमाण वाढवा- (calories)
वजन वाढवण्यासाठी शरीरात कॅलरीचं प्रमाण वाढवणं अतिशय महत्त्वाचं. तुम्ही जर दिवसाला 2100 किलो कॅलरी घेता, तर त्यामध्ये साधारण 1000 किलो कॅलरी वाढवू शकता. असं करण्यासाठी आहारात बीट, मुळा, मोड आलेली कडधान्य, डाळींब अशा पदार्थांचा समावेश करा. 

ज्यादा कैलोरी

नारळाचं तेल- (Coconut oil)
नारळाचं तेल वजन वाढवण्यासाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळं जेवण नारळाच्या तेला तयार करण्यास सुरुवात करा. 

नारियल का तेल

व्यायाम- (Excercise)
खाण्याच्या सवयी बदलण्यासोबतच वजन वाढवण्यासाठी आणि योग्य पातळीवर आल्यानंतर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामही तितकाच महत्वाचा. योगासन आणि व्यायाम केल्यामुळं तणाव दूर होतो. त्याला ध्यानधारणेची साथ मिळाल्यास याचे सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतात. 

एक्सरसाइज

जास्त दुग्धजन्य आणि स्निग्ध पदार्थांचं सेवन- (heavy and oily food which has healthy fats)
वजन वाढवण्यासाठी आहारामध्ये जास्त दुग्धजन्य आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करणं फायद्याचं ठरेल. तूप, दही, दूध, पनीर, तत्सम पदार्थ यामध्ये चांगला पर्याय ठरतात. 

हैवी खाना

गाजराचा ज्यूस - (Carrot juice)
वजन वाढवण्यासाठी अनेकदा गाजराचा ज्यूस पिण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळं आतड्यांमधीय एंन्झाईम्स सक्रिय होतात. यामुळं शरीरात न्यूट्रिएंट्स योग्य पद्धतीनं शोषून घेतले जातात. 

गाजर का जूस