मुंबई : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी जीम, डाएट तसंच विविध पर्यांयांचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा योगा आणि जीम करायला त्यांना वेळ नसतो. शिवाय डाएट सुद्धा व्यवस्थित फॉलो करता येत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून ते आपले वजन झटपट कमी करु शकणार आहेत.
तुमच्या किचनमध्ये असलेल्या मसाल्यांमध्ये वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हिंग. हिंगाचे अनेक फायदे असून तो आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. हिंगामुळे फक्त भाजी चविष्ट होत नाही तर हिंगाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं वजन देखील कमी करु शकता.
हिंगाचा वापर करुन तुम्ही झटपट वजन कमी करु शकता. आज आपण जाणून घेणार आहोत की वजन कमी करण्यासाठी हिंगाचा कसा वापर करायचा.
हिंगाचे पाणी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हिंगाच्या पाण्याचा वापर करून आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करता येते. हिंगाच्या पाण्याने चयापचय सुधारता येते. अशावेळी कोमट पाण्यात हिंग मिसळून त्याचे सेवन करावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)