Benefits of Ghee Roti: सध्याच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला माहितीये का की घी रोटीचे म्हणजे पोळीवर तूप घालून खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आपल्याला अनेक पदार्थांमधून जीवनसत्त्वं आणि पोषकतत्त्वं मिळतात. तुम्हाला माहितीये का की पोळीवर तूप खाऊन पोळी खाल्ल्यानंही तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. या लेखातून आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
तूपात अनेक खनिजे आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात. आपल्या मज्जासंस्था, हाडं आणि मेंदू तंदूरूस्त होण्यासाठा मदत होते. त्यातून आपल्या मेंदूसाठी फार उपयुक्त आहे. त्यातून आपल्याला उर्जाही मिळते. यामुळे आपलं मेटाबॉयलिझम खूप चांगले राहते. सोबतच आपली पचनक्रियाही सुधारते. पोळ्यातील ग्लुटन आणि फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यात मदत होते. तुपात बटरिक अॅसिड असते. ज्यामुळे टी सेल्स मोठ्या प्रमाणात वाढतात. सोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तुपात फॅटी अॅसिड असते. सोबतच फॅट सोलेबल व्हिटॅमिन्स (Fat Souable Vitamins) असतात. यात A,D,E,K अशी जीवनसत्त्वे असतात.
आपल्या आहारात आपण तूपाचे सेवन करू शकतो. ज्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. तूपाची पोळी खाल्लानं आपले वजनही नियंत्रित राहते सोबत त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. आपली शुगरही कंट्रोलमध्ये राहते. हेल्थी कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. आपण तूप लावलेली पोळी खाल्ली तर आपलं पोटंही बराच वेळ भरलेलं राहते. आपण योग्य प्रमाण तुपाचे सेवन करावे. तूपानं आपले हार्मोन्सही संतुलित राहतात.
पोळीवर तुपाचे आपल्या आरोग्यासाठी नेमके फायदे काय आहेत?
अनेकांना बटरही खायला आवडते. परंतु बटर हे आपल्या शरीरासाठी काही परिणामी चांगले असले तरीसुद्धा बटर आणि तूपात गोंधळ करू नका. वजन वाढेल अशा कोणत्याच पदार्थांचे अतिसेवन करू नका. तेव्हा योग्य पद्धतीनं तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)