मुंबई : अनेकदा महिलांना त्यांच्या स्तनांमध्ये जडपणा जाणवतो. काही स्त्रिया ही परिस्थिती गांभीर्याने घेतात, तर काही ती सामान्य मानतात. स्तनांमध्ये जडपणा हे स्तनांना सूज येण्याचं लक्षण असू शकतं. दरम्यान स्तनांमध्ये सूज येण्याची कारणं आणि लक्षणं अनेक आहेत.
स्तनांना सूज येण्याचं सामान्य कारण premenstrual syndrome मानलं जातं. जेव्हा महिलांना मासिक पाळी येते तेव्हा त्यांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढू लागते, ज्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात. याशिवाय आणखी काही कारणं आहेत, ज्यामुळे स्तनामध्ये सूज येऊ शकते.