मुंबई : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लस हे एकमेव प्रभावी शस्त्र मानलं जातंय. यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त 18 वयापर्यंतच्या नागरिकांचं लसीकरण केलं जातंय. पण आता लवकरच 18 वर्षांखालील मुलं म्हणजेच 12 वर्षे वयाची मुले ही लस घेऊ शकतील. यासाठी, ड्रग्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (DCGI) ने झायडस कॅडिलाच्या तीन डोस लसीला देशात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
दरम्यान ही लस भारतात केव्हा येणार यावर झायरस समूहाचे एमडी डॉ शर्विल पटेल यांनी माहिती दिली आहे. झायडस ग्रुपचे एमडी डॉ शर्विल पटेल यांनी सांगितलं की, लसींचा पुरवठा सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होईल. नवीन उत्पादन केंद्रात ऑक्टोबरपासून आम्ही लसींचे उत्पादन दरमहा 1 कोटी पर्यंत वाढवू शकतो.
डॉ शर्विल पटेल यांनी लसीच्या किंमतीबद्दल देखील माहिती दिली. पुढील आठवड्यात ZyCOV-D लसीच्या किंमतीबाबत स्पष्टता येईल पटेल यांनी सांगितलं.
शर्विल पटेल लसीच्या प्रभावीतेबद्दल बोलताना म्हणाले, आमच्या कोविड -19 लसीची कार्यक्षमता 66 टक्क्यांहून अधिक आहे आणि डेल्टा प्रकाराविरुद्ध त्याची कार्यक्षमता सुमारे 66 टक्के आहे. ही तीन डोसची लस आहे. पहिल्या डोसनंतर, दुसरा डोस 28 व्या दिवशी आणि तिसरा डोस 56 व्या दिवशी दिला जातो. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची प्रौढ आणि किशोर वयातील लोकांसाठी मंजूर आहे.
XycoV-D ही भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजूर केलेली सहावी लस आहे. आतापर्यंत, स्थानिक पातळीवर उत्पादित कोविशील्ड आणि कोवॅक्सिन व्यतिरिक्त, रशियाची स्पुतनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला परवानगी देण्यात आली आहे.