मुंबई : मुलांमध्ये दात चावण्याची सवय सामान्यपणे आढळून येते. पण ही सवय बरेचदा दिसून आल्यास पालकांसाठी हा चिंतेचा विषय ठरतो. ही अनैच्छिक क्रिया साधारणपणे झोपेत होते. अनेक पिडीयाट्रीशन आणि चाईल्डकेयर प्रोफेशनल्सच्या सल्ल्यानुसार साखरेचे अति सेवन हे यामागचे कारण आहे. मुलांमध्ये दात चावण्याची सवय दिसून आल्यावर घरातील अनुभवी, मोठी माणसे मुलांना गोड न देण्याचा सल्ला देतात. पण असे केल्यानंतर देखील मुलांमध्ये ही सवय पुन्हा पुन्हा दिसून आली.
यावर खोलवर लक्ष घातल्यानंतर लक्षात येतं की दात चावणे ही तोंडाची समस्या नसून याचा संबंध आतड्यांशी आहे. याचा मानसिकतेशी घनिष्ट संबंध आहे. परंतु, मुलांमध्ये हीच सवय सातत्याने आढळून आली तर ते तोंडाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.
रात्री झोपेत दात चावण्याची सवय अनेक मुलांमध्ये दिसून येते. मुंबईच्या Dentzz Dental Care च्या aesthetic dentist, डॉ. करिश्मा जराडी यांच्या सल्ल्यानुसार सतत दात चावल्याने दातांची झीज होऊ लागते आणि त्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटी होण्याची शक्यता असते.
परंतु, दात चावण्याची कारणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असतात. याची काही कारणे पुढीलप्रमाणे:
दिवसभरातला ताण
डोळ्यांवरील दाब
सायनस इन्फेकशन
खूप शारीरिक दमझाक झाल्यास
वातावरणातील बदल
नवीन चष्माची सवय होताना
सतत हेडबँड्स वापरल्यास
हार्मोनल बदल
टेन्शन किंवा ताण असलेल्या लोकांमध्ये ही सवय अधिकतर दिसून येते. राग, दुःख आणि निराशा यामुळे दात चावण्याची समस्या उद्भवते, असे डॉ. जराडी म्हणाले. मी मान्य करते की कधी कधी माझा राग विनाकारण मुलीवर निघतो. ताण, टेन्शन, प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यामुळे मुलीच्या लहानशा चुकीवर देखील मी खूप चिडत असे. बाळाला दात येताना ही काळजी नक्की घ्या
यावर नियंत्रण आणण्यासाठी मी रात्रीच्या वेळी शांत राहण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी तिला न ओरडता तिला प्रेमाने जवळ घेऊन तिला खुश ठेवत असे. कारण लहान मुलांना प्रेम आणि सुरक्षितता महत्त्वाची असते. ती त्यांना मिळाल्यास त्यांना शांत व आरामदायी झोप मिळते. मुलांना ब्रेसेस लावण्यांपूर्वी या गोष्टी नक्की जाणून घ्या
तुम्ही काय करायला हवे?
जर तुमच्याही मुला/मुलीला ही सवय असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. रागावर नियंत्रण ठेवल्याने व मुलीला प्रेमपूर्वक वागणूक दिल्याने मला फायदा झाला. असेच सगळ्यांबरोबर होईल असे नाही. भीती, राग, लैंगिक शोषण तसंच मदतीची गरज असल्यास किंवा एखाद्या गोष्टीची जबरदस्ती, अधिकार गाजवणे यामुळे मुलं रात्री झोपेत दात चावतात. म्हणून जर तुम्ही मुलांना जवळ घेऊन, थोपटून झोपवल्यावर देखील त्यांना शांत झोप मिळत नसेल तर चाईल्ड कॉऊन्सिलरचा सल्ला घ्या. मुलांशी तुम्ही स्वतः संवाद साधा. तसंच डेंटिस्टकडून नियमित दातांचे आरोग्य तपासून घ्या.