पाण्याच्या बाटलीवर का असतात आडव्या रेषा ...कारण आहे फारच इंटरेस्टिंग....एकदा वाचाच

तुम्ही हेही पाहिलं असेल की वेगवेगळ्या बाटल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या रेषा बनवल्या जातात

Updated: Jul 23, 2022, 05:14 PM IST
पाण्याच्या  बाटलीवर का असतात आडव्या रेषा ...कारण आहे फारच इंटरेस्टिंग....एकदा वाचाच  title=

lines on water bottles:   तुम्ही पाण्याच्या बाटल्या पाहिल्या असतील किंवा तहान लागली असेल तर कुठूनतरी पाण्याची बाटली विकत घेऊन तहान भागवली असेल.  पण तुम्ही कधी त्या बाटल्यांवरील रेषा काळजीपूर्वक पाहिल्या आहेत का? तुम्ही पाहिलं असेल तर कधी विचार केला आहे की पाण्याच्या बाटल्यांच्या वर या आडव्या रेषा का लावल्या जातात.

अनेक लोक अनेक वर्षांपासून या बाटल्या विकत घेत आहेत, परंतु या बाटल्यांवर या रेषांमागील कारण काय असेल याकडे बहुतेकांनी कधीच लक्ष दिले नाही.  तुम्ही हेही पाहिलं असेल की वेगवेगळ्या बाटल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या रेषा बनवल्या जातात.

चला, आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या या रेषांचे महत्त्व काय काय याबद्दल जाणुन घेऊया.

जर तुम्हाला वाटत असेल की पाण्याच्या बाटल्यांवरील या ओळी स्टाईलसाठी आहेत, तर हे एक मुख्य कारण नाहीये तर याचं मुख्य कारण म्हणजे बाटलीवरील रेषा त्यांना ग्रिप देतात. पाण्याच्या बाटल्या हार्ड प्लास्टिकपासून बनवल्या जात नाहीत, तर पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी हार्ड प्लास्टिकऐवजी मऊ प्लास्टिकचा वापर केला जातो.अशा परिस्थितीत पाण्याच्या बाटल्यांवर या रेषा न लावल्यास बाटल्या सहज वाकतात, त्यामुळे बाटली फुटण्याचा धोका असतो.

 याशिवाय पाण्याच्या बाटल्यांवर या रेषा लावण्याचे आणखी एक कारण आहे. पाण्याच्या बाटल्यांवर लाईन्स यासाठी दिल्या आहेत जेणेकरून ती पकडताना चांगली पकड मिळू शकेल, बाटली हातातून निसटू नये आणि ती सहज हातात धरता येईल.