जगभरातील अनेक गोष्टी आहेत अगदी परफेक्ट असतात. पण महिलांचे स्तन यासाठी अपवाद आहेत. ज्याप्रकारे दोन हात, पाय आणि डोळे यांचा आकार थोड्याफार फरकाने सारखाच असतो. मात्र अनइवन ब्रेस्ट साइज ही अतिशय सामान्य बाब आहे. मात्र हे तेव्हाच लक्षात येते जेव्हा स्तन पूर्णपणे विकसित झालेले असतात. पण यामागे काय कारण आहे? आणि हे कोणत्या आजाराचे लक्षण तर नाही ना?
स्तनांचे छोटे-मोठे आकार का असतात? याबाबत ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी ट्रेन्ड अवॉर्ड विनिंग डॉक्टर आणि ऑथर डॉक्टर तनाया उर्फ डॉक्टरस क्यूटरसने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती शेअर केली आहे.
स्तनांचे लहान मोठे आकार असले तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. जेव्हा स्तन विकसित होत असतात तेव्हा हार्मोनल बदलांमुळे हे फरक पाहायला मिळतात. स्तनांचा आकारच नाही तर रचना देखील वेगवेगळी असते. डॉक्टर तनाया यांच्या म्हणण्यानुसार, ब्रेस्ट साइजमध्ये खूप फरक असू शकतात. कप साइजनुसार तुम्ही स्तनांचे अंतर पाहू शकतात.
स्तनांचे वेगवेगळे आकार असणे ही फार मोठी समस्या नाही, परंतु जर तुमच्या स्तनांमध्ये अचानक बदल झाला तर त्याचे कारण काही आजार किंवा हार्मोनल समस्या असू शकते. याचे कारण काही प्रकारचे गळू देखील असू शकते. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की गरोदरपणात स्तनामध्ये बदल होतो, परंतु त्याशिवाय हे काही मोठ्या शारीरिक बदलांचे लक्षण असू शकते.
एटिपिकल डक्टल हायपरप्लासिया (ADH) स्तनाच्या ऊतींच्या पेशींमध्ये बदल घडवून आणते. जेव्हा स्तनाच्या आतील दुधाच्या नलिका जास्त प्रमाणात वाढू लागतात तेव्हा असे होते.
जर स्तनाचा आकार सुरुवातीपासून असाच असेल तर त्यात काही अडचण नाही, पण जर तुमच्या स्तनांमध्ये कमी कालावधीत खूप बदल होत असतील तर ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत, आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे शक्य आहे की अशा प्रसंगी, स्तनाचा आकार केवळ हार्मोनल बदलांमुळे बदलत आहे, परंतु इतर काही कारणे देखील असू शकतात.