मुंबई : महिलांनी अनेकदा मोठ्या व्यक्तींकडून मासिक पाळीदरम्यान दही खाऊ नये असं ऐकलं असेल. पिरीयड्सच्या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. यावेळी गर्भाशय आकुंचन पावणं, सूज येणं अशा तक्रारी उद्भवतात. या काळात थंड तसंच आंबट पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.
आंबट आणि थंड पदार्थ खाल्ल्याने जळजळ वाढते परिणामी यामुळे वेदना वाढतात. दही थंड आणि आंबट आहे. जाणून घेऊया मासिक पाळी दरम्यान दही खाणे सुरक्षित आहे की नाही?
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पिरीयड्सदरम्यान दही न खाणं हा केवळ एक गैरसमज आहे. मुळात दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे सूज कमी करण्यास मदत करतात. मासिक पाळी दरम्यान दही खाल्ल्याने स्नायू दुखणं आणि क्रॅम्प्सच्या समस्या कमी होतात.
कॅल्शियम म्हणून दही एक चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे दह्याच्या योग्य प्रमाणातील सेवनाने ते हाडं मजबूत होतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दह्याचं सेवन हे रात्रीच्या वेळस करू नये. जर तुम्हाला दही किंवा त्याचे पदार्थ खायचे असतील तर ते सकाळच्या वेळेस खावेत. रात्रीच्या वेळेस दह्याचं सेवन केल्यास पित्त तसंच कफाचा त्रास होऊ शकतो.