मुंबई : यकृत म्हणजेच लिव्हर शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आपण जे पण खातो-पितो त्याला पचवण्याचे महत्त्वपूर्ण काम यकृत करत असते. यकृत रक्ताला शुद्ध करण्याचेही काम करत असते. आयुर्वेदात काही घरगुती उपायांनी, आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने यकृत योग्यरित्या, सुरळित कार्य करण्यासाठी मदत करत असल्याचे सांगितले आहे.
लसून यकृतातील काही विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. लसूनमध्ये अॅन्टिऑक्सिटडेंट, अॅन्टिबायोटिक आणि अॅन्टिफंगल तत्व असतात. त्यामुळे यकृत साफ ठेवण्यासाठी लसून फायदेशीर ठेरते. गाजरमध्ये असणारे व्हिटॅमिन ए यकृताचे रोग होण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे जेवणात लसून, गाजराचा वापर करणे गुणकारी ठरते.
सफरचंद संपूर्ण शरीरासाठीच आरोग्यदायी असते. यकृतासाठी सफरचंद सर्वोत्तम मानले जाते. सफरचंदमधील पेक्टिन शरीर शुद्ध करण्यास आणि पाचन तंत्रापासून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. अक्रोडमध्ये असणारे एमिनो अॅसिड यकृताला नैसर्गिकरित्या डीटॉक्स करते. त्यामुळे दररोज अक्रोड खाण्याने यकृत शुद्ध ठेवण्यास मदत होते.
ग्रीन टीमधील अॅन्टिऑक्सिडेंट यकृताचे कार्य चांगले बनवते. दूधाच्या चहापेक्षा ग्रीन टी पिण्याचा शरीराला फायदा होतो. हिरव्या पालेभाज्या रक्तातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी मदत करतात. तसेच शरीरातील जड धातूंचा प्रभाव कमी करून यकृत सुरक्षित ठेवतात. व्हिटॅमिन सी असणारी आंबट संत्रे, लिंबू यांसारखी फळं खाणंही यकृत स्वच्छ करतात. हळदही यकृतासाठी उत्तम औषध मानले जाते.