हलगर्जीपणाचा कळस! अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला दिलं चुकीचं रक्त

6 महिन्यांच्या मुलाला चुकीचं रक्त चढवल्याचा हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Updated: Sep 11, 2021, 11:19 AM IST
हलगर्जीपणाचा कळस! अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला दिलं चुकीचं रक्त title=

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात एक मोठा आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. 6 महिन्यांच्या मुलाला चुकीचं रक्त चढवल्याचा हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

या चिमुकलीला रक्त चढवल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली. या संतापजनक प्रकारानंतर कुटुंबियांनी तातडीने तक्रार घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशंही दिले आहेत.

लॅबने दिला चुकीचा रिपोर्ट

तापामुळे, गोंदिया गावचे माजी सरपंच उज्जैन खासगी दवाखान्यात आपल्या 6 महिन्यांच्या नातवाची तपासणी करण्यासाठी पोहोचले होते. ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कुटुंबासह मुलाला रक्तासाठी शहरातील सुपर स्पेशालिस्ट लॅबमध्ये पाठवलं. मुलाच्या ब्लड रिपोर्ट B+ म्हणून दिला गेला.

अहवालानुसार, डॉक्टरांनी डेंग्यू असल्याचं सांगून मुलाला दाखल करण्यास सांगितलं. तसंच 2 युनिट रक्त आणण्यास सांगितलं. जे कुटुंबाने आणलं आणि मुलाला रक्त दिलं गेलं. जेव्हा अचानक मुलाची तब्येत बिघडू लागली तेव्हा मुलाची रक्ताची तपासणी पुन्हा केली गेली. ज्यामध्ये त्याचा रक्तगट B- असल्याचं आढळून आलं. त्यानंतर मुलाला पुन्हा बी निगेटिव्ह रक्त चढवण्यात आलं. त्यानंतर मुलाची प्रकृती स्थिर झाली.

लॅबने लपवला रिपोर्ट

निष्काळजीपणाच्या या संपूर्ण प्रकरणात, कुटुंबातील सदस्यांनी, समजूतदारपणा दाखवत, पॅथॉलॉजीमधून बी पॉझिटिव्ह रिपोर्टचा फोटो काढून मोबाईलमध्ये सेव्ह केला. सत्य समोर आल्यानंतर कुटुंबातील सदस्य पुन्हा त्या लॅबमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी फसवणूक करून अहवाल लपवला आणि दुसरा अहवाल दिला. परंतु कुटुंबाने अहवालाचा फोटो आधीच सेव्ह केला असल्याने प्रकरण उघड होऊ शकलं.