Cheapest Home Loan : स्वतःचे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी आर्थिक नियोजन, बचत आणि गुंतवणूक वर्षानुवर्षे करणे आवश्यक आहे. अनेकजण घर घेण्यासाठी गृहकर्ज घेतात. लवचिक कालावधी आणि कमी व्याजदरासह गृहकर्ज कुठे मिळेल असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या कमी व्याजाने गृहकर्ज देतात. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले. असे असूनही, जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा काही बँका बघू या ज्या तुम्हाला खूप कमी व्याजदरात कर्ज देतील. (cheapest home loan interest rates)
ईएमआय म्हणजे निश्चित व्याजासह कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची पूर्ण परतफेड होईपर्यंत समान हफ्त्यामध्ये वसूल केली जाणारी रक्कम म्हणजे EMI. दरमहा आकारल्या जाणार्या ईएमआयमध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम समाविष्ट केली आहे. EMI म्हणजेच मासिक परतफेडीचा विचार केल्याशिवाय, कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निश्चित केला जात नाही. सामान्यत: गृहकर्ज मोठ्या प्रमाणात आणि सुरक्षित कर्जाच्या स्वरूपात येते. म्हणजे तुम्ही कर्जाची रक्कम घ्या आणि कर्जाची परतफेड होईपर्यंत घर बँकेकडे गहाण ठेवा. तसेच गृहकर्जाला किंवा त्यातून घेतल्या जाणाऱ्या घराला विम्याचे संरक्षण असतं.
गृहकर्ज हे मुख्यतः नवीन किंवा जुने घर खरेदी करण्यासाठी, खुल्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी आणि प्लॉट खरेदी करून नवीन घर बांधण्यासाठी वापरले जाते. बँका तुमचा क्रेडिट स्कोअर आणि दरमहा आणि वार्षिक उत्पन्न, भविष्यातील वाढीचे उत्पन्न आणि खरं तर तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता ठरवून गृहकर्जाची रक्कम ठरवतात. गृहकर्जाची रक्कम निश्चित करताना, खरेदी केलेल्या घराची फक्त वर्तमान आणि भविष्यातील वाढ विचारात घेतली जाते, कारण गृहकर्जाने खरेदी केलेले घर बँकेसाठी अधिक महाग असते.