Video: 20 लाखांच्या नोटा उडवल्या... वरातीत JBC, छप्परावरुन नवरदेवावर पैशांचा पाऊस

20 Lakh Rs In Wedding Ceremony Video: हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमका हा प्रकार कुठे घडला आहे आणि पैसे उडवणारे कोण आहेत जाणून घ्या

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 20, 2024, 11:21 AM IST
Video: 20 लाखांच्या नोटा उडवल्या... वरातीत JBC, छप्परावरुन नवरदेवावर पैशांचा पाऊस title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे

20 Lakh Rs In Wedding Ceremony Video: तुम्ही अनेक आलिशान लग्नं पाहिली असतील. मात्र उत्तर प्रदेशमधील एका गावातील लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या चर्चेचं कारण आहे या लग्नात घडलेला एक फारच विचित्र प्रकार. या लग्नाच्या व्हिडीओमध्ये लग्न घरातील व्यक्तींना एवढा आनंद झाला आहे की ते लोक जेसीबीवर चढून आणि घराच्या छप्परावर चढून कागदाच्या तुकड्यांप्रमाणे नोटा उडवताना दिसत आहेत. या लोकांनी खरोखर अगदी नोटांचा पाऊस पाडल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 

नेमका कुठे घडला हा प्रकार?

उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यामधील एका लग्नाची चर्चा पंचक्रोषीमध्ये आहे. या लग्नाच्या वरातीमध्ये नातेवाईकांनी जेबीसीवर चढून, घराच्या छप्परावर चढून नाचणाऱ्या वऱ्हाड्यांवर नोटांचे बंडल उडवल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ गर्दीतील एका व्यक्तीने काढल्याचं दिसत आहे. व्हिडीओत पैसे उडवताना दिसणाऱ्या व्यक्ती या नवऱ्या मुलाचे नातेवाईक आहेत. हे लोक 100, 200 आणि 500 च्या नोटा उडवताना दिसत आहेत. अगदी पेपरचे तुकडे असावेत अशा सहजपणे हे लोक लाखो रुपये हवेत उधळताना दिसथ आहेत. घराच्या अंगणात आणि जेबीसीसमोर नाचणारे वऱ्हाडी या उडवलेल्या नोटा मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत आहे. 

20 लाख उडवले

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ देवलहवा गावातील रहिवाशी असलेल्या अफजाल आणि अरमानच्या लग्नातील आहे. लग्नाच्या वरातीमध्ये घरच्यांनी जवळपास 20 लाख रुपये दौलतजादा केल्याप्रमाणे उडवले. नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांमधील अनेक तरुणांनी जेसीबी आणि छप्परावरुन मनसोक्तपणे नोटा उधळत आनंद साजरा केला. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ....

अनेकांनी नोंदवला आक्षेप

ज्या प्रमाणात या वरातीत नोटा उधळण्यात आल्या ते पाहून हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी अशाप्रकारे संपत्तीची उधळण करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.