Sachin Tendulkar-Sara Tendulakr Vote Video: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात आज २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, अनेक सेलिब्रिटीही मतदान करण्यासाठी पोहोचत आहेत. दरम्यान, देशाचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही कुटुंबासह मतदानासाठी पोहोचला. मुलगी सारा तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर सोबत सचिन तेंडुलकर दिसला. मतदान केल्यानंतर सचिन तेंडुलकरनेही मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही केले.
सचिन तेंडुलकर सकाळीच मतदान करण्यासाठी मुंबईतील वांद्रे पश्चिम केंद्रावर पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. सचिन तेंडुलकरला पाहताच मतदानाला आलेले त्याचे चाहतेही त्याला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सचिन तेंडुलकर हा निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' आहे.
VIDEO | Maharashtra elections: Indian cricket legend and also the Election Commission of India icon Sachin Tendulkar (@sachin_rt), his wife Anjali Tendulkar, and daughter Sara Tendulkar cast vote in Bandra West, Mumbai. Here's what he said.
"I would like to appeal people to… pic.twitter.com/AuKwqk4jLv
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2024
#WATCH | Mumbai: Former Indian Cricketer Sachin Tendulkar, his wife Anjali Tendulkar and their daughter Sara Tendulkar, show their inked fingers after casting vote for #MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/ZjHix46qmb
— ANI (@ANI) November 20, 2024
मतदारांना केले खास आवाहन
मतदान केल्यानंतर सचिन तेंडुलकरने मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. तो म्हणला, "मी एवढेच म्हणेल की मतदान करा. ही आपली जबाबदारी आहे. कारण मी निवडणूक आयोगाचा आयकॉन आहे, मी तुम्हाला मतदान करण्याची विनंती करत आहे. येथील सुविधाही उत्तम आहेत. आयोजकांनी येथे चांगली सोय केली आहे. मला आशा आहे की केवळ इथेच नाही तर प्रत्येक केंद्रावर संपूर्ण मतदानाच्या काळात चांगल्या सुविधा असाव्यात आणि कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये. नक्की मतदान करूया."