नवी दिल्ली : ISISच्या 2 हजार दहशतवाद्यांनी भारतावर हल्ल्याचा कट केलाय. UNच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा केलाय. आयसिस आणि खोरासन मिळून हल्ल्याचा कट आखतायत. भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंकेत हल्ल्याची योजना आहे.
हक्कानी नेटवर्कचाही या कटात सहभाग आहे. हक्कानी नेटवर्क पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी ISIच्या इशाऱ्यावर काम करते. हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये पसरलेयत. दहशतवाद्यांची ऑनलाईन भरतीही सुरुय. मालदीव आणि श्रीलंकामध्ये खासकरुन ही मोहीम जोरदार सुरुय.