मुंबई : इनकम टॅक्स रिटनर्न भरण्याची वेळ येते तेव्हा सर्वात जास्त टेंशन टॅक्स वाचवण्याचं असतं. अशातच जे लोक टॅक्स कॅल्कुलेशनमध्ये अडकून पडतात. ITR भरताना अनेकवेळा कळतं की, जेवढा टॅक्स कापला गेला आहे, त्यांची लायबिलिटी त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच आणखी टॅक्स भरावा लागेल.परंतु टॅक्स कसा वाचवावा याबाबत कायम संभ्रम असतो. त्यामुळे या तीन टीप्सच्या माध्यमातून टॅक्स वाचवण्यास तुम्हाला मदत होईल.
नफा टॅक्स फ्री ठेवा
म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोक नेहमीच लॉंग टर्म सोबतच प्राफिट बुक करत असतात. बहुतांश लोकांचा शेअर किंवा म्युच्युअल फंडच्या बाबतीत समज असतो की, जेवढा जास्त वेळ गुंतवणूक ठेवणार तेवढा जास्त वेळ नफा होईल. परंतु लोकं हे विसरतात की, त्यावर टॅक्स सुद्धा भरावा लागतो. अशातच थोडे शहानपण महत्वाचे ठरते. सध्याच्या नियमांनुसार 1 लाख रुपयांपर्यंत लॉंग टर्म कॅपिटल गेनवर एका आर्थिक वर्षासाठी टॅक्स लागत नाही. अशातच 3-4 वर्षात एकाचवेळी प्राफिट बुक करण्याऐवजी प्रत्येक वर्षी थोडे थोडे प्राफिट बुक करत रहा. त्यामुळे तुमचा नफा हा टॅक्स फ्री असतो.
कॅपिटल लॉस
बहुतांश गुंतवणूकदारांना माहिती असते, की, शॉर्ट टर्म कॅपिटल लॉसला लॉंग टर्म कॅपिटल गेन सोबत एडजस्ट करण्यात येते. लॉंग टर्म कॅपिटल लॉस फक्त लॉंग टर्म कॅपिटल गेनसोबतच एडजस्ट करता येते. अशातच तुम्ही काही लॉस देखील करा. म्हणजेच टॅक्स वाचवायला मदत होईल.
तुम्हाला हे कॅल्कुलेट करावे लागेल की किती लॉस तुमचा टॅक्स वाचवू शकेल. म्हणजेच तुमचा टॅक्सपण वाचेल आणि जास्त नुकसान पण होणार नाही. लॉस बुकिंगच्या माध्यमांतून तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमधील कमकुवत स्टॉक्समधून बाहेर पडून थोडं नुकसान घेऊ शकता.
बॉंड्स पासून वाचवा टॅक्स
घर विकण्यातून झालेल्या नफ्यातून नेहमीच दुसऱ्या घरात गुंतवणूक करून फायदा घेण्यात येतो. परंतु, 54 EC बॉंड्समध्ये गुंतवणूक करूनही फायदा घेता येतो. कारण या बॉंड्समध्ये मिळणाऱ्या रिटर्न्सवर कोणताही TDS लागत नाही. घर विकल्याने झालेल्या नफ्यातून वेगवेगळ्या भागांना 54 EC बॉंड्समध्ये गुंतवणूक करता येते. हे PSU बॉंड्स असतात. 5 वर्षांपर्यंत ट्रान्सफर करता येत नाही. यामध्ये 50 लाखापर्यंत गुंतवणक करता येते. त्यावर टॅक्समध्ये सवलत मिळते.