कुरूक्षेत्र : पंचकुला जंगळ मंगळवारी झालेल्या तीन चिमूकल्यांच्या हत्यांनी थरारून गेले. मृत चिमूकल्यांमध्ये 2 मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. बापाच्या सांगण्यावरूनच या चिमूकल्यांच्या काकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बाप आणि काकाला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सारसा गावातील तीन मुले बेपत्ता झाली होती. तेव्हापासून गावभर एकच खळबळ उडाली होती. अखेर या चिमूकल्यांचे मृतदेह जंगलात आढळून आले. समीर (11), सिमरन (7) आणि समर (6) अशी या चिमूकल्यांची नावे असल्याचे समजते. या चिमूकल्यांची हत्या त्यांच्या काकाने बापाच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांना काका आणि बापाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी मोरणी जंगल परिसरात तीन मुलांचे मृतदेह असल्याची माहिती कळताच परिसर हादरून गेला. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना तत्काळ दिली. तीनही मुलांना गोळ्या झाडून ठार केरण्यात आले आहे. पोलिसांनी तीनही चिमूकल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. घडलेला प्रकार पाहून पोलिसांनी तपासयंत्रणा वेगाने फिरवली असता, बेपत्ता झालेली ती तीन मुले हिच असल्याचे समोर आले. कुटूंबियांना चिमूकल्यांच्या मृत्यूची बातमी कळताच एकच कल्लोळ उडाला.
दरम्यान, चिमूकल्यांची हत्या झाली असून, त्यांचे मृतदेह मिळाले असल्याची माहिती देण्यासाठी पोलिसांनी चिमूकल्यांच्या वडिलांना फोन लावला. मात्र, वडिलांचा फोन बंद होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी वडिल सोनू मलिककडे खोदून चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत चिमूकल्यांची हत्या ही सोनू मलिक व काका जगदीप मलिकने केल्याचे पुढे आले. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे वडील सोनू मलिक याचे अनन्य एका महिलेशी अनैतीक संबंध आहेत. त्यातून त्या महिलेस अपत्येही झाली आहत. त्यातूनच ही हत्या झाल्याचे समजते.