६ वर्षाच्या मुलाचे युट्यूब चॅनल जगात ८ व्या स्थानी, करतो एवढी कमाई

फॉर्ब्ज मॅग्झीनने युट्यूबवर जास्त पैसे कमावणाऱ्या युट्यूबर्सची यादी जारी केली. यामध्ये ६ वर्षाचा मुलगा रेयान हा युट्यूब चॅनलवर आठव्या स्थानी आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2017, 10:38 AM IST
 ६ वर्षाच्या मुलाचे युट्यूब चॅनल जगात ८ व्या स्थानी, करतो एवढी कमाई  title=

फॉर्ब्ज मॅग्झीनने युट्यूबवर जास्त पैसे कमावणाऱ्या युट्यूबर्सची यादी जारी केली. यामध्ये ६ वर्षाचा मुलगा रेयान हा युट्यूब चॅनलवर आठव्या स्थानी आहे. 

'रेयॉन्स टॉयज रिव्यू'

या चॅनलने २०१७ मध्ये खूप सबस्क्रायबर मिळवत चांगली कमाई केली. 'रेयॉन्स टॉयज रिव्यू' नावाच्या युट्यूब चॅनलवर रेयान हा खेळण्यांचा रिव्ह्यू करतो. 

सबस्क्राइबर्स 

हा चॅनल त्याचे आईवडील चालवितात. १६ मार्च २०१५ ला बनविलेल्या या युट्यूब चॅनलला सध्या १० लाखाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. 

रेयानच्या प्रत्येक व्हिडिओला साधारण १० लाखाहून अधिक ह्व्यूज येत असतात. हे चॅनल सर्व प्रकारच्या खेळण्यांचा रिव्ह्यू करते. 

चॅनलची कमाई 

एवढच नव्हे, मुलांसाठी विज्ञानाशी निगडीत एक्सपेरिमेंट व्हिडिओ ही शेअर केले जातात.

फोर्ब्जने जारी केलेल्या सुचीनुसार, रेयानच्या युट्युब चॅनलची कमाई ११ मिलियन डॉलर आहे.