उत्तराखंड : देहरादूनमध्ये (dehradun) राहणाऱ्या एका 78 वर्षीय वृद्धेने आपली संपूर्ण संतप्ती काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावावर केली आहे. पुष्पा मुंजियाल असं या वृद्धेचं नाव आहे. पुष्पा मुंजियाल यांनी यामागे एक खास कारण असल्याचं सांगितलं आहे.
पुष्पा मुंजियाल यांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्र देहरादूनचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंग यांच्याकडे सुपूर्द केली. राहुल गांधी यांच्या प्रभावाने आपण खूप प्रभावित आहोत,गांधी घराण्याने स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे, असं पुष्पा मुंजियाल यांनी यावेळी म्हटलं.
इंदिरा गांधी असोत की राजीव गांधी, त्यांनी या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिले, असे ते म्हणाले. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशसेवेसाठी स्वत:ला झोकून दिलं आहे, असं पुष्पा मुंजियाल यांनी म्हटलं आहे.
न्यायालयात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती देताना मुंजीवाल यांनी राहुल गांधी यांच्या नावाने मृत्युपत्र सादर केलं असून माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी त्यांच्याकडे सोपवावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
उत्तराखंडमधील रहिवासी असलेल्या या महिलेच्या नावावर 50 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. यासोबतच 10 तोळे सोन्याचाही समावेश आहे.