पत्नीनं 89 वर्षीय पती विरोधात केली तक्रार, म्हणाली 'मी त्याच्या हायपरसेक्शुअल...'

माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं. लग्न झाल्यानंतर तर पती आणि पत्नी एकमेकांच्या जवळ येतात. मात्र, असे म्हटले जाते की वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीची Sexual Need ही कमी होत जाते. दरम्यान, सध्या एका 87 वर्षी वयोवृद्ध महिलेनं गुजरातच्या 181 या हेल्पलाइन नंबरवर फोन करून 89 वर्षीय पती विषयी गंभीर तक्रार केली आहे. त्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे.

Updated: Nov 2, 2022, 04:53 PM IST
पत्नीनं 89 वर्षीय पती विरोधात केली तक्रार, म्हणाली 'मी त्याच्या हायपरसेक्शुअल...' title=

मुंबई : माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं. लग्न झाल्यानंतर तर पती आणि पत्नी एकमेकांच्या जवळ येतात. मात्र, असे म्हटले जाते की वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीची Sexual Need ही कमी होत जाते. दरम्यान, सध्या एका 87 वर्षी वयोवृद्ध महिलेनं गुजरातच्या 181 या हेल्पलाइन नंबरवर फोन करून 89 वर्षीय पती विषयी गंभीर तक्रार केली आहे. त्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे.

87 वर्षी वयोवृद्ध महिलेनं गुजरातच्या 181 या हेल्पलाइन नंबरवरवर फोन करत 89 वर्षीय हायपरसेक्शुअल पतीला वैतागल्याची तक्रार केली आहे. त्यांना त्यांच्या पतीपासून सुटका हवी आहे. त्यासाठी तिला मदत हवी आहे. ही घटना सयाजीगंजमधील आहे. महिलेनं आरोप पतीवर आरोप केला की, वृद्ध पती तिच्याकडे नेहमी शरीरिक संबंध ठेवण्याची मागणी करतो. महिलेनं सांगितलं की, ती फार आजारी आहे आणि अशात ती पतीची इच्छा पूर्ण करू शकत नाही.

यावेळी अभयम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'दोघांमध्ये अनेक वर्ष चांगलं रिलेशनशिप होतं. दरम्यान, त्या एक वर्षाआधी आजारी पडल्या आणि त्यांना बेडवरून उठणंही अवघड झालं आहे. इतकंच काय तर त्या जागेवरून हलू ही शकत नव्हत्या. सगळ्याच गोष्टींसाठी त्यांना मुलगा आणि सूनेची मदत घ्यावी लागते. 

दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोपी पतीला त्याच्या पत्नीची स्थिती चांगलीच माहीत आहे. पण तरीही ते तिच्याकडे शारीरिक संबंधाची डिमांड करत राहतो. रिपोर्ट्सनुसार, त्या महिलेचा पती रिटायर्ड इंजिनिअर आहे. ते घरात नेहमीच भांडण करतात. त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर ते पत्नीसोबतच त्यांच्या मुलालाही ओरडतात. हे फक्त घरापर्यंत मर्यादित नाही तर त्यांच्या घरात भांडण होतं हे त्यांच्या शेजारच्यांनाही माहित आहे. पण यावेळी अती झाल्याचं सांगत त्या महिलेनं पतीविरोधात तक्रार दाखर केली आहे. 

याविषयी बोलताना अभयम अधिकारी म्हणाले, 'आम्हाला दोन दिवसांपूर्वी महिलेचा फोन आला होता. त्यानंतर आम्ही लगेच त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या पतीला भेटलो. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही म्हणालो की, यामुळे तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे आणि तुमची पत्नीला हे पटत नाही आहे. 

मग अभयम टीमनं आरोपी पतीची काउन्सेलिंग केली. त्यांना सीनिअर क्लबस जॉइन करण्याचा आग्रह केला. अभयम अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या सदस्यांनी त्याना काउन्सिलिंग करण्याचा आणि सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला.