पंडित धीरेंद्र शास्त्रींच्या जीवाला धोका? बागेश्वर धाममध्ये पिस्तूल आणि काडतूसह पकडला गेला व्यक्ती; एकच खळबळ

Bageshwar Dham News: बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथे एका व्यक्तीला पिस्तूल (Pistol) आणि काडतूससह पकडण्यात आलं आहे. आरोपीला पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. आरोपीचं नाव रज्जन खान असल्याचं सांगितलं जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 20, 2023, 07:06 PM IST
पंडित धीरेंद्र शास्त्रींच्या जीवाला धोका? बागेश्वर धाममध्ये पिस्तूल आणि काडतूसह पकडला गेला व्यक्ती; एकच खळबळ title=

Bageshwar Dham News: पंडित धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) यांच्या बागेश्वर धाममध्ये (Bageshwar Dham) मंगळवारी एकच खळबळ उडाली. याचं कारण एका व्यक्तीला बेकायदेशीर शस्त्रांसह पकडण्यात आलं. आरोपीजवळ एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसं सापडली आहेत. ही बातमी समोर येताच प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. 

बेकायदेशीर हत्यारासह पकडण्यात आलेली ही व्यक्ती मुस्लीम असल्याची प्राथमिक माहिती आहे. एखाद्या मोठ्या कटाअंतर्गत तो आला असावा असा अंदाज आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. तरुणाचं नाव रज्जन खान असून तो शिवपुरी जिल्ह्याचा निवासी असल्याचं समजत आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बागेश्वर धामच्या परिक्रमा मार्गाजवळ एक व्यक्ती संशायस्पदरित्या फिरताना आढळला होता. यानंतर पोलिसांना या संशयित व्यक्तीची माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणाची चौकशी केली. यानंतर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल सापडलं. 

पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने आपलं नाव रज्जन खान असल्याचं सांगितलं आहे. आरोपी गढा गावाजवळ हायवेवर उतरला होता. इतक्यात पोलीस तिथे पोहोचले होते. पोलिसांना पाहिल्यानंतर त्याने बागेश्वर धामच्या दिशेन पळ काढला होता. पण पोलिसांनी परिक्रमा मार्गाजवळ त्याला पकडलं. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर कोर्टात हजर केलं. पोलीस सध्या तरुणाची चौकशी करत आहेत. 

ग्रेटर नोएडामध्ये 7 दिवस भरणार दरबार, 20 लाख भक्त होणार सहभागी

धीरेंद्र शास्त्री पुढील एक महिन्यासाठी ग्रेटर नोएडात असणार आहे. यासाठी सध्या जोरात तयारी सुरु आहे. कार्यक्रमात जवळपास 20 लाख भक्त सहभागी होण्याची शक्यता आहे. 

अमृत कल्याण सेवा ट्रस्टकडून ग्रेटर नोएडामधील जैतपूर येथे श्रीमद्वागत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. येथे 10 ते 16 जुलैपर्यंत बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील प्रमुख धर्माचार्य, पीठाधीश्वर आणि संतांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 

मुख्य आयोजक शैलेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या सानिध्यात सुरु होणाऱ्या या कथेला 10 जुलैपासून सुरुवात होईल. भागवत कथा 10 जुलैपर्यंत प्रत्येक दिवस होळी. सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि सनातन धर्म वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं कथा संचालन समितीचे अध्यक्ष पवन त्यागी यांनी सांगितलं आहे. 20 लाख भक्त या कार्यक्रमात सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे. भक्तांसाठी कार्यक्रमस्थळी विशेष तयारी करण्यात आली आहे.