aadhar to Pan Link Status: आधार कार्ड ही सध्या काळाची गरज झाली आहे. अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणूनही याचा वापर केला जातो. बँक खात्यापासून (Bank Account) ते गॅस सिलिंडरपर्यंत आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्ड (Aadhar Card) महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दहा वर्ष जुने आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update) करण्याची मोहिम केंद्राने हाती घेतली असून यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ट्विट करून माहिती दिली आहे.
If your #Aadhaar had been issued 10 years ago & had never been updated - you may now upload Proof of Identity & Proof of Address documents online at https://t.co/CbzsDIBUbs ‘FREE OF COST’ from 15 March - June 14, 2023.@ceo_uidai @GoI_MeitY @PIB_India @_DigitalIndia @mygovindia pic.twitter.com/CK03dCNFRF
— Aadhaar (@UIDAI) March 15, 2023
तुम्ही जर आधार कार्ड काढून 10 वर्षाचा कालावधी लोटला असेल तर ते अद्ययावत अर्थात अपडेट करण्याचे आवाहन UIDAI ने केले आहे. नागरिकांना आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, फोटो आणि बायोमॅट्रोत डाटा अद्ययावत करावा लागणार आहे. यासाठी आधार कार्ड वापरकर्ता myaadhaar पोर्टलचाही वापर करू शकता किंवा जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करू शकता. मात्र myaadhaar पोर्टवर अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत. परंतु आधार केंद्रावर जाऊन अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागतील. ही सुविधा 15 मार्चपासून सुरू झाली असून 14 जूनपर्यंत मर्यादित असणार आहे.
UIDAI ने आधार धारकांना आवाहन केले आहे की, MyAadhaar पोर्टलला भेट देऊन दस्तऐवज अपडेट सुविधेचा मोफत लाभ घेऊ शकतात. कागदपत्रे अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. परंतु आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रे अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. यापूर्वी, आधार पोर्टलवर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी आधार कार्ड वापरकर्त्यांना 25 रुपये द्यावे लागत होते.