लग्नासाठी (marriage) चांगला मुलगा किंवा मुलगी शोधण्यासाठी सध्या सोशल मीडियाचाही (social media) मोठा वापर केला जात आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांच्या आयुष्याची ओळख फक्त सोशल मीडियावरून झाली आणि त्या दोघांनी लग्न (marriage) केले. सोशल मीडियावर असे अनेक ग्रुप्स आहेत ज्यात वेगवेगळ्या समाजातील लोक आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी स्थळ शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक जाहिरात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जोडीदारासाठी विचित्र अटी घालण्यात आल्या आहेत. जोडीदाराला दोनपेक्षा जास्त भावंडे नसावीत, असेही या अटींमध्ये म्हटलं आहे. (advertisement for marriage viral on social media)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जाहिरातीत जोडीदाराला दोनपेक्षा जास्त भावंड नसावेत, असे म्हटले आहे. वार्षिक पगार (yearly income) देखील 30 लाख रुपयांपेक्षा कमी नसावा. यासोबत जोडीदाराची उंची 5.7 ते 6 फूट असावी, अशी मुलीच्या कुटुंबियांनी घातली आहे. या व्हायरल पोस्टमध्ये मुलाच्या शिक्षणाबाबतही अटी घालण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, जर जोडीदाराने आयआयटीत शिक्षण घेतले असेल तर त्यातही तो टॉप फाईव्ह कॉलेजमधला असायला हवा. जर एनआयटीमध्ये शिक्षण घेतले असेल तर त्यातही तो काही निवडक महाविद्यालयामध्ये शिकलेला असावा. कहर म्हणजे या पोस्टमध्ये त्या महाविद्यालयांची नावेही नमूद केली आहेत.
त्याचप्रमाणे, जर जोडीदाकडे एमबीए पदवी असेल तर ती उच्च महाविद्यालयातूनच असावी. नोकरीचे ठिकाण दिल्ली-एनसीआर असावे, अशीही अट घातली आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेली ही जाहिरात @RetardedHurt नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. जाहिरातीच्या शेवटच्या भागातही कोणी जातीचा असावा असा उल्लेख असावा. ज्यात अग्रवाल जातीची आणि मंगळ नसलेल्याबाबतही भाष्य करण्यात आलं आहे.
What is your take on this? pic.twitter.com/FWO1YGyxge
— Dr.D G Chaiwala (@RetardedHurt) October 17, 2022
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एवढ्या मागण्यांमुळे लग्न कसे होईल, असे अनेकांनी म्हटलं आहे. त्याच वेळी, इतर युजर्सनी, ज्या व्यक्तीचे आयुष्य आहे त्याला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. या विषयावर भाष्य करणारे आम्ही कोण, असा सवाल केला आहे. या पोस्टवर आतापर्यंत शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत.