Mahakumbh 2025 मधील सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाचा ग्लॅमरस मेकओव्हर, नव्या लूकने नेटकरीही अवाक्

Mahakumbh 2025 Monalisa Makeover Video :  मोनालिसाचा मेकअप केलेला लूक पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया... 

दिक्षा पाटील | Updated: Jan 22, 2025, 12:23 PM IST
Mahakumbh 2025 मधील सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाचा ग्लॅमरस मेकओव्हर, नव्या लूकने नेटकरीही अवाक् title=
(Photo Credit : Social Media)

Mahakumbh 2025 Monalisa Makeover Video : प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये माळा विकण्यासाठी एक 16 वर्षांची मोनालिसा आली होती. तिच्या साधेपणानं आणि सुंदरतेनं सगळ्यांना वेड लावलं होतं. इंदूरची राहणारी मोनालिसा ही तिच्या कुटुंबासोबत महाकुंभ मेळाव्यात आली होती. ती इतकी व्हायरल झाली की तिला माळा विकणं कठीण झालं होतं. त्यानंतर मोनालिसाला तिच्या घरच्यांनी प्रयागराजवरून तिच्या घरी इंदूरला पाठवलं. 

खरंतर, व्हायरल होत असल्यामुळे मोनालिसाच्या स्टॉलवर लोकं सामान खरेदी करण्यापेक्षा तिच्यासोबत फोटो काढायला आणि व्हिडीओ शूट करायला यायचे. तिच्या आई-वडिलांना चक्क तिला सगळ्यांपासून लपवून ठेवावं लागलं. तिचा चेहरा लपवला आणि तिच्या अंगावर शॉल टाकली जेणे करून लोकांना ती कोण आहे हे ओळखता येणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर तिच्या घरच्यांनी तिला इंदूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. घरी परतल्यानंतरही मोनालिसाची लोकप्रियता काही कमी झाली नाही. लोकं तिच्या संबंधीत अपडटे सोशल मीडियावर शोधू लागले. या सगळ्यात आता तिचा एक मेकअप व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोनालिसा कोणत्या पार्लरमध्ये मेकअप करत रेडी होताना दिसली. 

मोनालिसाच्या मेकअप व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्यांना विविध कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, इतकी सुंदर मुलगी आहे आता तिनं चित्रपटांमध्ये यायला हवं. दुसरा नेटकरी म्हणाला, ही मुलगी महाकुंभची स्टार झाली. तिसरा नेटकरी म्हणाला, मोनालिसाला पाहून 'कश्मीर की कली' चं गाणं आठवलं. तर काही नेटकऱ्यांना तिचा हा लूक आवडलेला नाही. अनेकांनी कमेंट करत म्हटलं की ती विना मेकअप चांगली दिसते. तिला उगाच मेकअप करत सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महाकुंभ सारख्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन लोकं कुठे आध्यात्मिक शांती आणि ईश्वराच्या शोधात करतात. तिथे सर्वसामान्य मुली इतक्या लोकप्रिय होणं हे आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण घटनेनं पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकतं. मोनालिसा आता लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे आता ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.