लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू

भारताचे लढाऊ विमान गुजरातच्या कच्छ येथे मंगळवारी कोसळले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. जॅग्वार विमानाने जामनगर येथून उड्डाण घेतलं होते अशी माहिती आहे.  

Updated: Jun 5, 2018, 07:55 PM IST
लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू title=

नवी दिल्ली : भारताचे लढाऊ विमान गुजरातच्या कच्छ येथे मंगळवारी कोसळले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. जॅग्वार विमानाने जामनगर येथून उड्डाण घेतलं होते अशी माहिती आहे.  

 जामनगरातील हवाई तळावर नियमित सराव सुरू असताना जॅग्वार हे लढाऊ विमान बेरजा गावाजवळील माळरानावर कोसळले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या संजय चौहान या वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली. भारतीय हवाई दलाचं जॅग्वार हे लढाऊ विमान कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा परिसरात कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.  

दरम्यान, अपघाताचं कारण समजू शकलं नसून, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा यांनी दिली.