देहरादून : उत्तराखंडमधील केदारनाथजवळ वायूसेनेचं एमआय 17 हेलिकॉप्टर कोसळून २ पायलटसह ४ जण जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीवरुन साहित्य घेऊन केदारनाथकडे जात होतं. मात्र त्याचवेळी या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिपॅडपासून अवघ्या 60 मीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या हेलिकॉप्टरमध्ये 6 जण होते. यापैकी एका पायलटसह इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
यापूर्वी केदारनाथ आपत्तीवेळी 2013 मध्ये इथे MI-17 हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्यावेळी 8 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतरच्या हेलिकॉप्टर अपघातात. 18 मे 2017 रोजी केदारनाथमध्ये इंडोकॉप्टर कंपनीचं हेलिकॉप्टर हेलीपॅडवर रुतलं होतं.