श्रीनगरमध्ये भररस्त्यात महिलेच्या 'वंदे मातरम'च्या घोषणा

देशभरात ७१ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी श्रीनगरचा लाल चौक एका महिलेनं 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी चांगलाच दणाणून सोडला. 

Updated: Aug 16, 2017, 09:41 AM IST
श्रीनगरमध्ये भररस्त्यात महिलेच्या 'वंदे मातरम'च्या घोषणा title=

श्रीनगर : देशभरात ७१ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी श्रीनगरचा लाल चौक एका महिलेनं 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी चांगलाच दणाणून सोडला. 

या महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ही महिला तर घोषणा देतेच आहे शिवाय पोलिसांनाही घोषणा देण्याचं आवाहन करत असल्याचं दिसतंय. तर पोलीस तिला हटवताना या व्हिडिओमध्ये पहायला मिळतंय. 

उल्लेखनीय म्हणजे, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला काश्मीरसह श्रीनगरच्या लालल चौकमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक असते. 
 
अभिनेते अनुपम खेर यांनीही या महिलेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलाय. त्यांनी ही महिला काश्मीरी पंडीत असल्याचं म्हटलंय. 

श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवायला आलेल्या २०० भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतलं होतं. गेल्या वर्षी हिजबुल कमांडर बुरहान वानी यांच्या एन्काऊंटरनंतर काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे.