Anand Mahindra Viral Video: आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचे नावं उद्योग विश्वात कायमच अव्वल राहिले आहे. आपल्या नवनव्या कल्पनांनी ते कायमच चर्चेत राहिले आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनतेशी संवाद साधत असतात. तेव्हा नुकताच त्यांनी एक नवा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा व्हिडीओ सध्या सगळीकडे नुसता धुमाकूळ घालतो आहे. हा एका कंटनेरचा व्हिडिओ (Truck Video) असला तरी या व्हिडीओत एक वेगळीच गंमत आहे. (anand mahindra shared unique truck video of modified truck into marriage hall marathi news)
आपल्या समाजात कायमच चांगल्या गुणांना आणि कौशल्यांना वाव दिला जातो. आपल्या कलागुणांना वाव मिळाला तर कायमच आपलं स्थान समाजात उंच राहतं. फक्त आपल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं. आणि तशी मार्गदर्शन करणारी माणसंही आजूबाजूला हवी असतात. अशा माणसांमधली एक व्यक्ती म्हणजे आनंद महिंद्रा. उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) कायमच समाजपयोगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजर असतात तसेच नेहमीच वेगवेगळ्या कामांमध्ये सहभागी होत असतात. ते एक लोकप्रिय उद्योजक असले तरी सोशल मीडियावरही (Social Media) ते कायमच सक्रिय असतात.
हेही वाचा - नव उद्योजकांसाठी गडकरींकडून नवा मार्ग मोकळा; आता risk free गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध
वर म्हटल्याप्रमाणे हा व्हायरल झालेला व्हिडीओ सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडीओत तुम्हाला एक कंटेनर दिसतो आहे. परंतु हा फक्त कंटेनर नाही तर हा एक लग्नाचा हॉल आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल पण हेच खरं आहे. ट्रकच्या पाठीमागच्या बाजूला 200 व्हराडींची व्यवस्था होईल अशी सोय करण्यात आली आहे.
I’d like to meet the person behind the conception and design of this product. So creative. And thoughtful. Not only provides a facility to remote areas but also is eco-friendly since it doesn’t take up permanent space in a population-dense country pic.twitter.com/dyqWaUR810
— anand mahindra (@anandmahindra) September 25, 2022
या कंटेनरमध्ये लग्नाचा हॉल असतो तसाच हॉल आहे. सगळ्या सोयी - सुविधाही येथे उपलब्ध आहेत. यामध्ये पाहूण्यांसाठी एक खुर्ची आणि टेबलाचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या कंटनेरला चालतं फिरंत लग्नघरही म्हटलं गेलं आहे. या हॉलला वेगळं असं रूप देण्यात आलं आहे. या हॉलमध्ये लोकांना बसायला आणि उभं राहायलाही चांगला वाव आहे.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
या कंटेनरचा वापर तुम्हाला होऊ शकतो. कायमच लग्नसभारंभासाठी कोणता हॉल बुक करावा असा प्रश्न नागरिकांना पडतो पण काळजी करू नका हा कंटेनर वापरून तुम्हीही त्याचा लग्नसभारंभांसाठी योग्य तो वापर करून घेऊ शकता. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे सध्या हा व्हिडीओ भलताच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही आनंद महिंद्रा यांचे कौतुक करतानाही दिसत आहेत. अशा कटेंनरमुळे सर्वांना फायदा होईल असा सर्वांना विश्वास आहे.
याबाबत व्यक्त होताना आनंद महिंद्रा म्हणाले आहेत की, ही कला ज्याने साकारली आहे त्याला मला भेटायचे आहे. यामुळे दुर्गम भागातील लोकांना याचा फायदा होईल असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.