पोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

Anand Mahindra Share video : सोशल मीडियावर आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करणारे सोशल मीडिया स्टार्सची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. अशातच आनंद महिंद्रा यांनी एका ट्रक ड्राईव्हच्या (YouTuber truck driver) संघर्षाची कहाणी शेअर केलीये.

सौरभ तळेकर | Updated: Apr 8, 2024, 07:32 PM IST
पोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video title=
Anand Mahindra, rajesh rawani

YouTuber truck driver Video : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता कोणीही प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचू शकतं, याचा प्रत्यय गेल्या तीन ते चार वर्षात अनेकांना आला असेल. सोशल मीडियावर (Social Media) गोष्ट व्हायरल झाल्याने अनेकजण प्रसिद्ध झाले. तर काहींनी आर्थिक फायदे देखील मिळवले. काही स्टार झाले अन् सिनेमात देखील काम करू लागले. काहींनी लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलाय. तर कोणी लोकांना फसवण्यासाठी... मात्र, या सोशल मीडियावर असंख्य गोष्टी लोकांच्या नजरेत आल्या. अशातच आता सोशल मीडियावर अॅक्टिव असणारे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक मोटिवेशनल स्टोरी शेअर केली आहे.  

आनंद महिंद्रा दररोज सोमवारी मंडे मोटिवेशन शेअर (Anand Mahindra Share video) करत असतात, जेणेकरून लोकांच्या आठवड्याची सुरूवात चांगली व्हावीय. अशातच आज देखील आनंद महिंद्रा यांनी एका ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची स्टोरी शेअर केली आहे. राजेश रवानी (Rajesh Rawani) नावाच्या ट्रक ड्रायव्हरचा एक व्हिडिओ शेअर केला, जो गेल्या 25 वर्षांपासून ट्रक चालवतो. ट्रकमधून माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासोबतच राजेश रवाणी फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगही (Food and Travel Blogging) करतात. त्याचीच कहाणी आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितली आहे.

काय म्हणतात आनंद महिंद्रा? 

25 वर्षांहून अधिक काळ ट्रक ड्रायव्हर असलेल्या राजेश रवानी यांनी त्यांच्या व्यवसायात फूड आणि ट्रॅव्हल व्लॉगिंग सुरू केलं आणि आता ते युट्यूबवर 1.5 मिलियन फॉलोअर्ससह सेलिब्रिटी आहेत, असं आनंद महिंद्रा म्हणतात. राजेश यांनी नुकतेच त्याच्या कमाईतून नवीन घर घेतलं आहे. त्यांनी हे दाखवून दिलंय की तुमचं वय किंवा तुमचा व्यवसाय कितीही विनम्र असला तरीही, नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास आणि स्वतःला पुन्हा नव्यानं तयार करण्यास उशीर झालेला नाही, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. 

पाहा Video

राजेश रवानी कोण आहेत?

राजेश रवानी हे ट्रक चालक आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून ट्रक चालवतात. 2021 मध्ये त्यांनी R Rajesh Vlogs नावाने YouTube वर चॅनल सुरू केलं होतं. या चॅनेलवर ते त्याच्या ट्रक ड्रायव्हिंगचे व्हिडिओ तसेच त्याच्या स्वयंपाकाचे व्लॉग आणि त्याच्या प्रवासादरम्यानची त्याची संपूर्ण दैनंदिन दिनचर्या शेअर करतात. त्याचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात आणि अनेक लोकं त्यांना नियमित फॉलो देखील करतात.