शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांची उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक

तेलंगणा सरकारने वचन केलं पूर्ण. शहीद जवानाच्या पत्नीला दिली सरकार नोकरी.

Updated: Jul 22, 2020, 04:44 PM IST
शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांची उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक title=

हैदराबाद : सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या संतोषी बाबू यांची पत्नी संतोषी यांची तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी संतोषी यांना सरकारी नोकरीवर नियुक्तीचं पत्र दिलं. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना फक्त हैदराबाद किंवा आसपासच्या भागातच त्यांनी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी या सध्या 8 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा यांच्यासमवेत दिल्लीत राहत आहेत. दुसरीकडे, हैदराबादमध्ये राहणाऱ्या संतोषच्या आईची इच्छा होती की मुलाची बदली कशीतरी हैदराबादमध्ये व्हावी. यापूर्वी तेलंगणा सरकारने कर्नल संतोष बाबूच्या कुटूंबाला पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

20 सैनिक झाले होते शहीद

गेल्या महिन्यात, गालवान खोऱ्यात चीनच्या बेकायदेशीर व्यापाराबाबत भारत आणि चीनच्या सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह सैन्यातील एकूण 20 जवान शहीद झाले. या चकमकीत कमीतकमी 43 चिनी सैनिक आणि अधिकारीही मारले गेले. खरंतर कर्नल संतोष बाबू सतत तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी सैनिकांसोबत बोलणी करत होते. पण परत येत असताना चिनी सैनिकांनी त्यांच्यावर फसवणूक करत हल्ला केला, त्यानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाली.