मुंबई : Punjab Assembly Election Results : पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'चे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) सत्ताधारी काँग्रेससह शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांना जोरदार धक्का देत सत्ता आपल्याकडे खेचून आणल्यात जमा आहे. 90 जागांवर 'आप' घाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेस केवळ 19 जागांवरच आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसला सत्तेतून पाय उतार व्हावे लागणार आहे. पंजाबमध्ये मिळालेल्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. (Arvind Kejriwal's first reaction after Aam Aadmi Party success in Punjab)
इस इंक़लाब के लिए पंजाब के लोगों को बहुत-बहुत बधाई। pic.twitter.com/BIJqv8OnGa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत आहे. या क्रांतीसाठी पंजाबमधील जनतेचे अभिनंदन, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी त्याबाबत ट्विट केले आहे. सोबत त्यांनी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
सत्तेतील काँग्रेसला (Congress) 'आप'ने जोरदार धक्का दिला आहे. विरोधी पक्षात असलेला पक्ष थेट सत्तेत बसणार आहे. तर काँग्रेस आणि अकाली दल (Akali Dal) यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी चढाओढ दिसून येत आहे. काँग्रेसला 20 जागा मिळवताना दमछाक दिसून येत आहे. त्याचवेळी भाजपलाही (BJP) दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जनतेने नाकारलेले दिसून येत आहे.
दरम्यान, काँग्रेसला पक्षातील अंतर्गत वादाचा फटका मोठा फटका बसला आहे. नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्याने ते देखील कुठेतरी नाराज होते. पण पंजाबच्या जनतेने नव्या पर्यायाला मतदान केले आणि तो पर्याय 'आप'च्या माध्यमातून उदयाला आला आहे. दिल्लीचे मॉडेल 'आप'ला फायदेशीर ठरल्याचे दिसून येत आहे.