आषाढी एकादशी | पायी वारीच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना पायी वारी नाकारण्यात आली आहे.

Updated: Jun 28, 2021, 06:29 PM IST
आषाढी एकादशी | पायी वारीच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका title=
representative image

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना पायी वारी नाकारण्यात आली आहे. 250 पालख्यांना पायी वारीसाठी परवानगी देण्यात यावी यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

आषढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना पंढरपुराची आस लागते. पायी वारीसाठी वारकऱ्यांचे पाय वळू लागतात. परंतु कोरोनामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील पायी वरीला परवानगी नाही. त्यामुळे नोंदणीकृत 250 पालख्यांना राज्य सरकारने पायी वारीची परवानगी द्यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका  दाखल करण्यात आली आहे.

जुन्या पालख्यांना राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. फक्त 10 महत्वाच्या पालख्यांना बसनं पंढरपुरात जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे इतर पारंपारिक पालख्यांनाही वारीची परवानगी देण्यात यावी अशी संत नामदेव संस्थान नरसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अशी माहिती ॲड श्रेयश गच्छे आणि ॲड राज पाटील यांनी झी 24 तास शी बोलताना दिली.