Assembly Election Results 2021: पाहा कोणत्या राज्यात कोणाचं सरकार ?

कोणत्या राज्यात कोणाचं सरकार येणार?

Updated: May 2, 2021, 02:56 PM IST
Assembly Election Results 2021:  पाहा कोणत्या राज्यात कोणाचं सरकार ? title=

मुंबई : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. आतापर्यंतचा कल स्पष्ट आहे की पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी, आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल आणि केरळमध्ये पी. विजयन पुन्हा सरकार स्थापन करणार आहेत. त्याचबरोबर पुडुचेरीमध्ये पहिल्यांदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे. यावेळी तमिळनाडूमध्ये द्रमुकचे सरकार स्थापन होणे जवळजवळ निश्चित आहे.

1. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बनणार मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये तृणमूल काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. टीएमसी पुन्हा बंगालमध्ये विजयाची हॅटट्रिक करताना दिसत आहे, तर भाजप अजूनही 100 जागांच्या खाली आहे. यावेळी पश्चिम बंगालची निवडणूक अत्यंत रंजक होती. टीएमसी पहिल्यांदाच थेट भाजपशी भिडली. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये ममता बॅनर्जींचा विजय विजय जवळजवळ निश्चित आहे. जर हे ट्रेंड निकालात बदलले गेले तर 66 वर्षीय ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र, नंदीग्राम सीटवरुन ममता बॅनर्जी सध्या पुढे आहेत. पण काही वेळापूर्वी त्या मागे होत्या. शुभेंदू अधिकारी त्यांच्या विरोधात मैदानात आहेत. ममता बॅनर्जी यांनी 20 मे 2011 रोजी प्रथमच आणि 27 मे 2016 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

पश्चिम बंगालमध्ये किती जागांवर आघाडी

भाजप -  83 जागांवर पुढे

टीएमसी - 206 जागांवर पुढे

काँग्रेस - 1 जागांवर पुढे

2. तमिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेसचे सरकार

जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर प्रथमच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा बदल दिसत आहे. पलानिसामी यांची खूर्ची जाण्याची शक्यता आहे. पलानीसामी यांचा पक्ष एआयएडीएमके आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये बहुमतापासून मागे आहे. निवडणुकीत अण्णाद्रमुकचा पराभव झाला तर त्यांचा पक्षाच्या भवितव्यावरही परिणाम होऊ शकतो. यावेळी अण्णाद्रमुक आणि भाजप एकत्र निवडणूक रिंगणात होते. दुसरीकडे द्रमुक आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होणे जवळजवळ निश्चित आहे. द्रमुकच्या वतीने एमके स्टालिन प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात.

तामिळनाडूत किती जागांवर आघाडी

एआयएडीएमके 91 जागांवर पुढे

डीएमके + 141 जागांवर पुढे

3. आसाममध्ये पुन्हा भाजपचे सरकार

आसामच्या जनतेने पुन्हा 59 वर्षीय सर्वानंद सोनोवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये सोनोवाल सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतांना दिसत आहेत. 1946 पासून आसामच्या राजकारणामध्ये दोनदा मुख्यमंत्री झालेला कोणीही व्यक्ती नाही. सोनोवाल 24 मे 2016 रोजी प्रथमच मुख्यमंत्री झाले. आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल यांच्यासोबत भाजपने येथे निवडणूक लढविली.

आसाममधील किती जागांवर आघाडी 

भाजप - 76 जागांवर पुढे

काँग्रेस - 47 जागांवर पुढे

इतर - 3 जागांवर पुढे

4. केरळमध्ये पी विजयन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार

डाव्या पक्षांचा जनसमूह आता फक्त केरळमध्ये उरला आहे. त्यामुळे डाव्या लोकशाही आघाडीसाठी सर्वात मोठे आव्हान होते ते सरकार वाचवणे. येथे अन्य 12 पक्षांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) यांच्याबरोबर एकत्र निवडणूक लढविली. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार एलडीएफ विजयी होताना दिसत आहे. जर तसे झाले तर 77 वर्षीय पी विजयन हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दुसरीकडे, काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न यावेळी देखील अपूर्ण राहणार आहे. भाजपला येथे फारसे यश मिळालेले नाही.

केरळमध्ये किती जागांवर आघाडी

डावे - 83 जागांवर पुढे

काँग्रेस 45 जागांवर पुढे

भाजप 4 जागांवर पुढे

5. पुडुचेरीमध्ये प्रथमच भाजप युतीचे सरकार

पहिल्यांदाच अशा छोट्या संघराज्य शासित राज्यात अशी शक्यता निर्माण झाली आहे जेव्हा भाजप युती सरकारमध्ये येऊ शकते. येथे ऑल इंडिया एनआर काँग्रेस अर्थात एआयएनआरसीच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एआयडीएमके सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पुढे आहेत. येथे युतीला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री एनआयआरसीचे अध्यक्ष एन. रंगास्वामी बनतील. रंगास्वामी दुसऱ्यांदा पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सरकारमध्ये भाजप आणि एआयडीएमकेचे मंत्रीही असतील. यावर्षी फेब्रुवारीमध्ये येथे काँग्रेस सरकार पडले.

पुडुचेरीच्या किती जागांवर आघाडी आहे

भाजप युती 8 जागांवर पुढे

काँग्रेस 3 जागांवर पुढे