मुंबई : जर तुम्ही निवृत्ती आणि भविष्याचे नियोज करीत आहात. तर अटल पेंशन योजना ही सरकारकडून चालवण्यात येणारी योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते. या योजनेचे संचाल पेंशन रेग्युलेटर PFRDA ही संस्था करते. या योजनेशी जोडले गेलेल्या सर्व सुविधांची गॅरंटी भारत सरकार देते. वर्ष 2015 मध्ये अटल पेंशन योजना सुरूवातीला असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षापर्यंतचे सर्व नागरिक गुंतवणूक करू शकतात. तसेच पेंशनचा लाभ घेऊ शकतात.
18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतच्या कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या योजनचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी तुमचे स्वतःचे बँकेचे अकॉंऊंट असणे गरजेचे आहे. तसेच बँक अकॉंऊंट आधारशी लिंक असायला हवे.
नोकरी करून अधिक कमाई होत नसल्याने लोकांना भविष्याची चिंता सतावत आहे. लोकं विचार करीत आहेत की, त्यांचे 60 वर्षानंतर खर्च कसा चालेल. त्या लोकांसाठी ही योजना परफेक्ट आहे. अटल पेंशन योजनेत किमान 1000 रुपये तसेच कमाल 5000 रुपये महिने पेंशन मिळते. जर तुम्ही 18 वर्षाचे झाला आहात. या योजनेचा लाभ घेऊ शकता.
जर तुम्हाला महिना 5 हजार रुपये पेंशन हवी आहे. आतापासून तुम्हाला महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच दिवसाला 7 रुपये. आपल्या वयानुसार योजनेसाठीचा प्रीमियम कमी जास्त होऊ शकतो.