अमर काणे, नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धटनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. रामलल्लाच्या अभिषेकसाठी देश-विदेशातून पाहुणे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला येणार आहेत. पाहुण्यांसाठी जेवणापासून ते निवासापर्यंत विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपली सेवा प्रभू रामाच्या चरणी करत आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येत प्रभू श्री रामचरमी एक आगळावेगळा विक्रम अर्पण करणार आहे.
राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नागपूरचे निवासी शेफ विष्णू मनोहर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तो राम भक्तांसाठी गोड प्रसाद तयार करणार आहेत. त्यासाठी त्यांची किंग साइज कढई त्यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहे. ही कढई क्रेनने उचलली जाणार आहे. त्यांनी अयोध्येतील दहा लाखांहून अधिक राम भक्तांसाठी एकाच वेळी 7 हजार किलो प्रसाद बनवून नवा विक्रम घडवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर त्यांच्या अयोध्येत प्रभू श्री राम चरणी एक आगळावेगळा विक्रम अर्पण करणार आहे. श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या काही दिवसानंतर विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल 7000 किलो शिरा (हलवा) तयार करणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास राम शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या राम शिरासाठी प्रचंड आकाराची खास सर्जिकल स्टीलची कढई सध्या नागपुरात तयार केली जात आहे.
सुमारे 1800 किलो वजनाची भव्य अशी कढई आहे. ही कढई तीन धातूंपासून बनवण्यात येत असलेली ही कढाई 15 फूट रेडीयस ची आहे. त्याच्याकरता वापरण्यात असणारे स्टील धरणच्या दारांकरताही वापरण्यात येत असून शेकडो किलो वजनाची ही कढई लवकरच अयोध्येच्या दिशेने रवाना केली जाईल. त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील विविध मंदिरात या कढईचे विशेष पूजन ही केले जाणार आहे.
या राम शिरासाठी लागणारे पदार्थ (जिन्नस) देशातील वेगवेगळ्या ठिकाणातून अयोध्येत आणले जाणार आहे. शिऱ्यासाठीचा खास रवा नागपुरातून जाणार आहे. तर खास तूप तिरुपती वरून आणला जाणार आहे. शिऱ्यात टाकला जाणारा सुका मेवा काश्मीर मधून बोलवला जाणार आहे. आजवर पाककलेत अनेक विश्वविक्रम केले असून हा विक्रम वैक्तिक नसेल, तर तो प्रभू श्रीरामाचा चरणी अर्पण करण्याच्या भावनेतूनच हे उपक्रम हाती घेतल्याची विष्णू मनोहर यांनी झी 24 तासला प्रतिक्रीया देताना सांगितले.
रवा 700 किलो, तूप 700 किलो, साखर 1120 किलो, दूध 1750 लिटर, पाणी 1750 लिटर, इलायची पावडर 21 किलो, जायफळ पावडर 21 किलो, केळी 100 डझन, तुलसी पत्ते 50 किलो, काजू किसमिस बदाम 300 किलो