पाकवरील एअरस्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले ?- ममता बॅनर्जीं

 ममता बॅनर्जी यांनी सरकारकडे एअरस्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत.

Updated: Feb 28, 2019, 08:40 PM IST
पाकवरील एअरस्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले ?- ममता बॅनर्जीं title=

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारकडे एअरस्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच सर्वपक्षीय बैठक घेतली नाही. यामुळे सरकारने ऑपरेशनची माहिती सर्वांसमोर आणावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

Image result for mamata banerjee and narendra modi zee

 जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला जैश ए मोहम्मदने आत्मघातकी हल्ला करत भारतीय लष्करावर निशाणा साधला. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी सीमेत घुसून जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर निशाणा साधला.  या एअर स्ट्राईकने पाकिस्तानात खळबळ उडाली. भारतात वायुसेनेच्या पराक्रमाचे कौतुक करण्यात आले. 
 

Image result for mamata banerjee and narendra modi zee

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत पत्रकार परिषदेत मारल्या गेलेल्यांचा आकडा दिला नाही. पण दहशतवादी कमांडर यांच्यासह अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला. तर या एअर स्ट्राईकमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान न झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. 

Image result for india airstrike zee news

 आता या एअर स्ट्राईकवर तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उत्तर मागितले आहे. विरोधक असल्याच्या नाते आम्हाला या ऑपरेशन आणि एअरस्ट्राईक संदर्भात पूर्ण माहीती हवी आहे.सरकारने सांगावे कुठे बॉम्ब टाकले गेले ? आणि किती दहशतवादी मारले गेले ? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. आंतरराष्ट्रीय मीडियातील वृत्तांचा दाखला यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिला. न्यूयॉर्क टाईम्समध्ये मी वाचलेल्या वृत्तानुसार या ऑपरेशनमध्ये कोणीच मारले गेले नाही तर काही मीडिया रिपोर्टमध्ये एक जण मारला गेल्याचे वृत्त आहे. म्हणून आम्हाला या सर्वाबद्दल पूर्ण माहिती हवी असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा जवानांच्या रक्ताचे राजकारण करण्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.