Bank Holiday in December 2022: नोव्हेंबर संपायला आता एकच दिवस उरला आहे. 2022 मधला शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरु होतो आहे. बँकेत (Bank) प्रत्येकाची कामं असतात. मात्र जर पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची काम असतील तर आधी बँकाचं कामकाज किती दिवस चालणार (Bank Holiday List) आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने december मध्ये बँकांना असलेल्या ( december Bank Holiday) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. डिसेंबरमध्ये दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार या दिवशी बँक बंद असेल, शिवाय काही सणदेखील आहेत त्यामुळे बँकांना सुट्ट्या आहेत.
डिसेंबरमध्ये 14 दिवस बँक बंद राहतील, मात्र ऑनलाईन आणि नेट बँकिंग सेवा उपलब्ध असेल. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI च्या ऑफिशिअल वेबसाईटवर डिसेंबरच्या महिन्यांच्या सुट्यांची यादी दिलेली आहे. (Bank Holiday know how many bank holidays in december 2022 )
- 3 डिसेंबर - : सेंट फ्रांसिस जेवियर फीस्ट (पणजी)
- 4 डिसेंबर - रविवार (सर्व ठिकाणी )
- 5 डिसेंबर : गुजरात विधानसभा इलेक्शन (अहमदाबाद)
- 10 डिसेंबर : दूसरा शनिवार (सार्वजनिक)
- 11 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)
- 12 डिसेंबर : Pa-Togan Nengminja Sangma (शिलॉन्ग)
- 18 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)
- 19 डिसेंबर : गोवा लिब्रेशन डे (पणजी)
- 24 डिसेंबर : चौथा शनिवार (सार्वजनिक)
- 25 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)
- 26 डिसेंबर : क्रिसमस सेलिब्रेशन/Losoong/Namsoong (आइजवाल, गैंगटोक, शिलॉन्ग)
- 29 डिसेंबर : गुरू गोविंद सिंह जन्मदिवस (चंडीगढ़)
- 30 डिसेंबर : U Kiang Nangbah (शिलॉन्ग)
- 31 डिसेंबर : थर्टी फस्ट (आइजवाल)
त्यामुळे आपली सर्व महत्वाची कामं जी बँकांशी निगडित आहेत ती उरकून घ्या...नाहीतर आपला खोळंबा होईल...