मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election) तीन टप्प्यांत मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परंतु, या निवडणुकीचे कल काही वेगळेच हाती येण्याची शक्यता आहे, तसे एक्झिट पोलमधून (Bihar Assembly Elections Exit Polls) दिसून येत आहे. बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजप यांची युती आहे. तर तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि काँग्रेस पक्षानेही एकत्रितपणे महागठबंधनच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली आहे. महागठबंधनला जतनेची पसंती मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये सत्तांतराची शक्यता असताना आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष असणार आहे. तर नितीश कुमार यांची खुर्ची धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये आरजेडी-काँग्रेस महागठबंधनला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर सत्ताधारी एनडीएची पीछेहाट होण्याची चिन्हे दिसून आहे. बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Elections ) : २४३ एकूण जागा, बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे.
#BiharExitPoll बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला बहुमत । एनडीए आणि महाआघाडीत काटें की टक्कर । चिराग पासवान यांच्या एलजेपीला अवघ्या ४ ते ५ जागांचा अंदाज । तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती#BiharExitPolls #Bihar #ExitPoll #BiharAssemblyElection2020 pic.twitter.com/tYeCSIwIlA
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 7, 2020
महागठबंधन - १२० (आरजेडी-काँग्रेस)
एनडीए - ११६ (भाजप-नितीश कुमार, जेडीयू)
अन्य - ७
आरजेडी - ८५
भाजप - ७०
जेडीयू - ४२
काँग्रेस - २५
एलजेपी - २
अन्य - १९
महागठबंधन - १२८
एनडीए - १०४
अन्य - ११
महागठबंधन - १२०
एनडीए - ११४
अन्य - ९
आरजेडी - ९२
भाजप - ७२
जेडीयू - ३८
काँग्रेस - १७
एलजेपी - २
अन्य - २२