बिकानेर : कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी लसीकरण करणे हा एक उपाय समोर आला. परंतु लस घेण्यासाठी लोकांना सरकारी लसीकरण केंद्रात जावे लागत आहे. परंतु राज्यस्थानमधील बिकानेर हे भारतातील असे शहर बनले आहे की, ज्या शहरात आरोग्य यंत्रणा डोअर टू डोअर सेवा देण्यात येणार आहे. म्हणजेच लोकांच्या घरी जाऊन त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. परंतु हा पर्याय फक्त 45 वर्षांवरील लोकांसाठी उपलब्ध केला आहे. त्यापेक्षा कमी वयोगटातील लोकांना मात्र लसीकरण केंद्रात जाऊनच लस घ्यावी लागणार आहे.
लोकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी येथील प्रशासनाने 2 रुग्णवाहिका आणि 3 स्टॅन्डबाय मोबाईल टीम तयार केली आहे. त्याच बरोबर प्रशासनाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे, जो व्हॉट्सअॅप नंबर आहे. ज्याच्या माध्यमातून लोकं त्यांच्या शंकेचं निरसण करु शकतात.
यासेवेसाठी आसपासच्या परिसरातील कमीत कमी 10 लोकांना रजिस्ट्रेशन करावे लागले. 10 लोकांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर रुग्णवाहिका त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करते. प्रशासनाने 10 लोकांची संख्या यासाठी ठेवली आहे, कारण लस वाया जाऊ नये हे त्यामागचे उद्दिष्ट आहे.
एका लसीच्या बॉटलमधून 10 लोकांना लसीकरण केले जाऊ शकते आणि एकदा का लसीची बॉटल खोलली आणि त्यामधले औषध वापरले गेले नाही, तर उरलेले औषध काही कामाचे नसते. लस वाया जाऊ नये या कारणामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
लोकांना लस दिल्यानंतर या रुग्णवाहिकेमधील काही लोकं लस दिलेल्या व्यक्तीचे निरिक्षण करण्यासाठी तेथेच थांबते, तर बाकीची टीम दुसऱ्या व्यक्तीच्या घरी लसीकरण करण्यासाठी जाईल.
बिकानेरची कलेक्टर नमिता मेहेता यांच्या वक्तव्यनुसार, 2011 च्या जनगणनेनुसार 7 लाखपेक्षा आधिक लोकसंख्या या भागात होती, त्यापैकी, 60 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.